Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुबई नव्हे तर भारताच्या 'या' शेजारी देशात मिळते सर्वाधिक स्वस्त सोनं; फक्त एक दिवस मुक्काम करावा लागेल

दुबई नव्हे तर भारताच्या 'या' शेजारी देशात मिळते सर्वाधिक स्वस्त सोनं; फक्त एक दिवस मुक्काम करावा लागेल
 

भारतीय आणि त्यांचे सोन्यावर असलेलं प्रेम हे जगभरात प्रसिद्ध आहे. प्रत्येक भारतीय महिलेला आणि पुरुषालाही आपल्या अंगावर सोनं असावं अशी इच्छा असते. तर सोने हे केवळ दागिणे नसून ते गुंतवणुकीचं माध्यम म्हणूनही अनेकजण त्याकडे पाहतात आणि आपला पैसा गुंतवतात.

पण भारतात आता सोन्याच्या किमतींनी कळस गाठला आहे. सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर त्याच्या किमती गेल्या आहेत. त्यामुळे दुबई आणि इतर अरब देशांतून सोने आणण्याकडे अनेकांचा कल आहे. पण दुबईपेक्षाही स्वस्त सोनं जगात आणखी एका देशात मिळतं.
जगातील सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळते असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर हे भूतान असं आहे. होय, जगातील सर्वात स्वस्त सोनं आशियाई देश भूतानमध्ये मिळतं. पण भूतानमध्ये सर्वात स्वस्त सोनं मिळण्याची कारणे काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात स्वस्त सोने भूतानमध्ये
भूतानमध्ये स्वस्त सोने मिळण्याची अनेक कारणे असली तरी सर्वात मोठे कारण म्हणजे भूतानमध्ये सोने हे करमुक्त आहे. सोनं स्वस्त असण्याचं तेच सर्वात मोठे कारण मानले जात आहे. याशिवाय भूटानमध्ये सोन्यावर कमी आयात शुल्क आहे. भूतान आणि भारताच्या चलनाचे मूल्य जवळपास सारखेच आहे.
असं असलं तरी तुम्ही भूतानमधून सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही अटी लक्षात ठेवाव्या लागतील. वास्तविक, सोने खरेदी करण्यासाठी पर्यटकांना भूतान सरकारने प्रमाणित केलेल्या हॉटेलमध्ये किमान एक रात्र मुक्काम करावा लागतो.

यासाठी काय अटी आणि शर्ती आहेत?
याशिवाय पर्यटकांना भूतानमध्ये सोने खरेदीसाठी अमेरिकन डॉलर आणावे लागतात. पर्यटकांना शाश्वत विकास शुल्क (SDF) भरावे लागते. त्याच वेळी भारतीयांना प्रति व्यक्ती प्रतिदिन 1,200 ते 1,800 रुपये मोजावे लागतात. तसेच पर्यटकांना सोने खरेदी करण्यासाठी पावती घेणे आवश्यक आहे. भूतानमधील ड्युटी-फ्री शॉपमधून ड्युटी-फ्री सोने खरेदी करता येते. ही दुकाने सामान्यत: लक्झरी वस्तूंची विक्री करतात आणि ती वित्त मंत्रालयाच्या मालकीची असतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.