सांगली : अल्पवयीन भावाकडून बहिणीवर अत्याचार
सांगली : शहरातील एका परिसरात सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन भावाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार दोन वर्षांपूर्वी घडला होता. त्यानंतर भावाने त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांसमवेत पीडितेसोबत सतत अश्लील कृत्य करणे सुरूच ठेवले होते. हा प्रकार 1 जानेवारी 2022 ते 3 जून 2024 या कालावधीत घडला. याबाबतची फिर्याद पुणे येथील एका शाळेच्या समुपदेशक महिलेने फरासखाना पोलिस ठाण्यात दिली होती. पुणे पोलिसांनी हा गुन्हा संजयनगर पोलिसांकडे वर्ग केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही मुलगी आई, भाऊ आणि बहिणींसह पुण्यात राहते. दोन वर्षांपूर्वी दिवाळी सुट्टीसाठी ती सांगलीतील आजीकडे आली होती. एकेदिवशी आई, बहीण आणि आजी या बाजारात खरेदीसाठी गेल्या असताना मुलीचा अल्पवयीन भाऊ तिच्या खोलीत आला. त्याने जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्या दिवसापासून संशयित अल्पवयीन मुलगा हा अश्लील बोलून पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत होता. संशयित मुलाचे दोघे अल्पवयीन मित्रही पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य करीत होते. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितेने कैफियत शाळेतील समुपदेशकासमोर मांडली. त्यानंतर ही घटना पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचली. या गुन्ह्याला सांगलीतून सुरुवात झाल्याने पुण्यातील फरासखाना पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी संजयनगर पोलिस ठाण्याकडे वर्ग केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.