राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारात येथील भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पक्षाकडून शपथ घेण्यासाठी फोन आल्याने मंत्रीम्हणून आज सायंकाळी नागपुरात शपथ घेणार असल्याने परळी परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे.
गेल्या पाच वर्षाचा राजकीय वनवास अखेर संपणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा गोपीनाथ मुंडे यांना गेल्या विधानसभेत पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर त्यांचा राजकीय वनवास सुरू झाला. मागच्या पाच वर्षांत ज्या ज्यावेळी राज्यसभा किंवा विधान परिषदचे जागा रिक्त झाल्या त्या त्या वेळी पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन होणार अशी चर्चा होत होती.
त्यांचे समर्थक सातत्याने पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करा अशी मागणी करत होते. मात्र पक्षाने त्यांना संधी दिली नाही. लोकसभेच्या निवडणुकीत माजी खासदार डॉ प्रितम मुंडे यांचे तिकीट काढून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. पण मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात झालेले जातीय ध्रुवीकरणामुळे काढावर पराजय झाला.त्यानंतर पक्षाने विधान परिषदेत संधी दिली. पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून राज्याच्या निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी घेतलेल्या सभेच्या ठिकाणी उमेदवार निवडून आले. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. रविवारी (ता.१५) होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना संधी मिळणार व दुसऱ्यांदा पंकजा मुंडे शपथ घेणार असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.