दुबईत लँडिंगवेळी विमानाचा अपघात; भारतीय डॉक्टरचा कुटुंबासोबतचा हवाई प्रवास राहिला अधुरा
मुंबई : मागील काही दिवसांपासून सातत्याने विमान कोसळण्याच्या घटना घडत आहेत. दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर रविवारी (29 डिसेंबर) जेजू एअरलाईन्सचे विमान कोसळले. या विमानात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्ससह 181 लोक होते.
यापैकी 179 जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांना वाचवण्यात आले. ही घटना ताजी असतानाच आता संयुक्त अरब अमिरातीत (दुबई) विमान कोसळ्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे 26 वर्षीय एक भारतीय डॉक्टरचा ही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिरातीतील रास अल-खैमाहच्या किनाऱ्याजवळ ही घटना घडली. सुलेमान अल मजीद (26) असे मृत्यू झालेल्या भारतीय डॉक्टराचे नाव आहे. तसेच, 29 वर्षीय एका पाकिस्तानी महिला पायलटचा मृत्यू झाल्याचे समजते. या अपघाताप्रकरणी सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात नेमका कसा झाला, याचा तपास केला जात आहे. तसेच, पाकिस्तानी महिला पायलट हिचा मृतदेह आज पाकिस्तानला पाठवण्यात येणार आहे.
दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीत जे विमान कोसळलं ते विमान भारतीय डॉ. सुलेमान यांनी खास पर्यटनासाठी म्हणून भाड्याने घेतले होते. तसेच, या विमानातील प्रवास आणि त्या अनुभवाचे साक्षीदार होण्यासाठी त्याचे वडील, आई आणि लहान भाऊ यांच्यासह संपूर्ण कुटुंब एव्हिएशन क्लबमध्ये उपस्थित होते. मात्र, सुलेमानचा धाकटा भाऊ पुढच्या विमानाने निश्चित स्थळी पोहोचणार होता.
या अपघाताप्रकरणी डॉ. सुलेमान यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर आम्ही सुलेमानला पाहू शकलो नाही. कारण त्यापूर्वीच तो मरण पावला होता. साधारण दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, विमानात असताना प्रथम आम्हाला सांगण्यात आले की, ग्लायडरशी रेडिओचा संपर्क तुटला आहे. आम्हाला नंतर सांगण्यात आले की ग्लायडरचे इमर्जन्सी लँडिंग झाले होते. अपघातानंतर आम्हाला रुग्णालयात नेण्यात आले, त्यावेळी आम्ही गंभीर जखमी झालो असल्याते आम्हाला समजले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.