सांगली येथील अहिल्यानगर चौकात मुरमाने भरलेल्या डंपर खाली चिरडून, दोन वर्षाचा चिमुकला जागीच ठार झाला. मनोज ओंकार ऐवळे (रा. अहिल्यानगर झोपडपट्टी) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. हा अपघात शनिवारी सकाळी नऊ वाजता झाला आहे. अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे, तर संतप्त जमावाने डंपरची तोडफोड केली आहे.
या बाबत सविस्तर माहिती असे की, अहिल्यानगर चौका मध्ये शनिवारी २९ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास, गाडी नं (एम एच १० डी टी ४४४०) हा मुरसाने भरलेला अशोक लेलैंड डंपर, माधवनगर हुन अहिल्यानगरकडे जात होता. तर अहिल्यानगर झोपडीत राहणार मनोज रस्त्याच्या कडेला खेळत असताना तो डंपर खालीच चिरडून त्याचा त्याचा जागेवर मृत्यू झाला. अपघात होताच ड्राइव्हरने गाडी सोडून पलायन केले. तर संतप्त जमावाने गाडीची तोडफोड केली आहे.
सदर गाडीवर गजानन सप्लार्स असे लिहिले असून, अहिल्यानगर चौकांतील पांढऱ्या पट्ट्याजवळ हा अपघात झाला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून जंपर ताब्यात घेतला तर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.