शेअर बाजार घसरत असताना करोडपती कसं बनावं? वॉरन बफेंनी सांगितला गुंतवणुकीचा मंत्र
जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांचा गुंतवणूक मंत्र तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. वॉरन बफे यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करताना सांगितले की, जेव्हा शेअर बाजार घसरतो तेव्हा इतरांप्रमाणे घाबरून जाण्याऐवजी बाजारात आणखी गुंतवणूक केली पाहिजे.
शेअर बाजारातील घसरण नेहमीच उत्तम गुंतवणुकीची संधी असते. सोप्या भाषेत सांगायचे तर, गुंतवणूकदाराने नेहमी घसरत असलेल्या बाजारात गुंतवणूक केली पाहिजे. मात्र, सध्याच्या बाजारातील घसरणीच्या काळात सर्वसामान्य गुंतवणूकदार हा मंत्र विसरून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कमी करत असल्याचे दिसून येत आहे.
इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक या वर्षी नोव्हेंबरमध्ये 35,943 कोटी रुपये होती. ऑक्टोबरच्या तुलनेत सुमारे 14 टक्के घसरण झाली आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) प्रवाहाबद्दल सांगायचे तर, सलग दुसऱ्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये 25,000 कोटी रुपयांहून अधिकचा ओघ आला आहे.
भू-राजकीय तणाव, यूएस निवडणुकीचे निकाल आणि इतर अनेक कारणांमुळे प्रचंड चढ-उतार असताना, किरकोळ गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. AMFI ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये डेट फंडांमध्ये 12,916 कोटी आणि हायब्रीड फंडांमध्ये 4, 124 कोटींचा ओघ आला. नोव्हेंबरमध्ये म्युच्युअल फंड उद्योगात एकूण 60,295 कोटी रुपयांचा ओघ होता. ऑक्टोबरमध्ये तो 2.4 लाख कोटी रुपये होता.
मोतीलाल ओसवालचे एएमसीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी अखिल चतुर्वेदी म्हणतात की, यूएस निवडणूक निकाल, भू-राजकीय उलथापालथ यासह अनेक आर्थिक कारणांमुळे शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार दिसून आला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी 'वेट अँन्ड वॉच'चामार्ग अवलंबला आहे. त्याचा परिणाम नोव्हेंबरमध्ये दिसून आला कारण गेल्या महिन्यात गुंतवणुकीत घट झाली आहे. तर एसआयपी प्रवाह सपाट राहिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.