मुंबई : मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल फेरीबोटीला एक सुसाट स्पीड बोटीने धडक दिली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३ नौदलाचे कर्मचारी आहे. तर १०१ लोकांना सुखरूप बचावले आहेत.
पण या अपघातात नाशिकहून मुंबईला उपचारासाठी आलेलं संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं आहे. दोन दिवस रुग्णालयात उपचार केल्यानंतर हे कुटुंब समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया परिसरात आले होते. मात्र त्यांचा हा आनंद क्षणात विरला. या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंबाचा बुडून मृत्यू झाला आहे.
राकेश आहिरे, पत्नी हर्षदा आहिरे आणि मुलगा निधेश आहीरे असं बोट दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबाचं नाव आहे. ते पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी होते. राकेश आहिरे हे दम्याच्या उपचारासाठी दोन दिवसापुर्वी पत्नी व मुलासह मुंबई आले होते. पण बोट दुर्घटनेत आहेर कुटुंबीयांचा मृत्यू झाला. दोन दिवस रूग्णालयात वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर आहिरे कुटुंब बुधवारी सायंकाळी मुबंईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. पण नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटीला धडक दिली.
या दुर्दैवी अपघातात आहेर कुटुंबातील तिघांचे श्वास थांबला. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेने पिंपळगांव बसवंतच्या आहेर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. मृत राकेश आहिरे यांचे वडील नाना आहीरे यांचा बांधकाम व्यवसाय आहे. तर राकेश यांना दम्याचा त्रास होता. सात वर्षांपूर्वी कल्याण येथील हर्षदा यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. पाच वर्षापुर्वी त्यांच्या घरात निधेशचा झाला होता. दम्याच्या आजारावर उपचारासाठी ते नेहमी मुंबईला जात असत.
यावेळी ते पत्नी हर्षदा आहेर (वय 28) आणि मुलगा निधेश (वय 5) यांच्यासह उपचारासाठी मुंबईतील खासगी रूग्णालयात आले. रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या ठिकाणी समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले. पण नौदलाच्या बोटीने प्रवाशी बोटीला दिलेल्या धडकेत संपूर्ण आहेर कुटुंबीयाचा मृत्यू झाला. राकेश आहेर यांचा जागीच पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर पत्नी हर्षदा आणि निधेश यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. आहेर कुटुंबातील तिघांचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.