सांगली.. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करत असल्याचा भास निर्माण करून आज अनेकजण शासकीय अधिकाऱ्यांना भीती दाखवून सरकारी अधिकाऱ्याकडून हजारो रुपयांचा मलिदा गोळा करण्याचा गोरख धंदा सध्या सांगली शहरासह जिल्ह्यात सुरू आहे. काहीजण "कृती" च्या नांवावर तर काहीजण 'लोकहित'च्या नावावर लाखो रुपये छापत आहेत. हे फक्त नमुना दाखल ,पण असे अनेक जण विविध मार्गांनी ब्लॅकमेकींग करून गडगंज झाले आहेत.
याबाबत गुप्तचर पोलीस यंत्रणेकडून यांची चौकशी सुरू झाल्याची माहिती आमच्याकडे उपलब्ध झाली आहे. आपणच या शहराचे उध्दारकर्ते आहोत या भावनेतून या मंडळींनी काम सुरू केले. सुरुवातीला सोशल मिडियावर एखाद्या प्रश्नाचा उहापोह केला गेला .त्यामुळे प्रसार मिडियानेही यांना वारेमाप प्रसिद्धी दिली. त्यामुळेच त्यांनी आपली दुकानदारी खोलली.सरकारी अधिकारी हे कातडी बचाव धोरण घेऊन काम करतात,... आणि त्यांनी यांना आपोआप हेरले, आणि हे. ही न कष्ट करता मिळणाऱ्या हजारो रुपयांना बळी पडले,... कालांतराने हे नित्याचेच झाले.एखाद्या प्रश्नावर यांनी बोंब ठोकायची,.. प्रसार माध्यमांनी याला जोरदार प्रसिद्धी द्यायची,... त्यामुळे संबंधित खाते, व तो अधिकारी घाबरून जायचा...यातून सुटका करण्यासाठी ,यात मातब्बर असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनी आपली नेहमीची कसब अवलंबली,.. आणि हे सामाजिक भावनेतून समाज विकासासाठी काम करण्याचा देखावा करणाऱ्या ब्लॅकमेकरांना शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या जाळ्यात अडकवले,... यातून हजारो रुपये मिळतात ...हे लक्षात येताच या ब्लकमेकर सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्रास लुटीचा धंदा अवलंबिला,... मित्रांनो,...आज यांच्या घरी दरमहा लाख ते दीड लाख रुपये न मागता घरपोच होत आहेत. हे सत्य आहे. मला सांगा , कृती कसली? अथवा लोकांचे हित म्हणून काम कसले? असो,. असा प्रश्न निर्माण होत आहे. खरे वास्तविक पहाता अशा अनेक सामाजिक भावनेतून काम करणाऱ्यांचा जगण्याचा इतर काही उद्योग आहे का? मग यांची कुटुंबे चालतात कशी? असा प्रश्न सद्या उपस्थित होत आहे.शासकीय अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून आपली स्वतःची तुंबडी भरणाऱ्या अशा या प्रत्येकांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे.
ज्या प्रसारमाध्यमांच्या जीवावर हे मोठे झाले,तेच सद्या या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीवरच घसरत आहेत. वाटेल ते आरोप करून ते स्वतःला आपण जगापेक्षा वेगळे आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा त्यांचा भास आहे. हे लवकरच पर्दाफाश होईल.कारण संबंधित शासकीय यंत्रणा या तपास कामी मोठ्या ताकदीने व गतीने कामाला लागली आहे.आणि प्रसार माध्यमांनीही यांचा लेखा- जोखा मांडण्याची तयारी केली आहे. एका हाताने करायचे आणि . दुसऱ्या हाताने फेडायचे ही म्हणं प्रचलित आहे म्हणून करावे तसे फेडावे म्हणतात.. सांगलीकरांनो...... पहा लवकरच,.. अशा प्रवृत्तीला आळा घालण्याची कट्टर कारवाई केल्याची आनंदाची बातमी सर्व जनतेला मिळेल .....
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.