नागाव : कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशदारात चक्कर येऊन पडल्याने युवतीचा मृत्यू झाला. देवयानी संजय देसाई ( वय २५) असे तिचे नाव आहे.
त्या एसबीआय इन्शुरन्समध्ये नुकत्याच रुजू झाल्या होत्या. आपल्या सहकारी महिला अधिकाऱ्यांसमवेत कामानिमित्त त्या सांगलीला गेल्या होत्या. सांगलीहून परतल्यावर बसस्थानकातून बाहेर येत असतानाच त्यांना चक्कर आली. सहकारी अधिकारी महिलेने देवयानी यांच्या घरी कळविले. त्यानंतर त्यांना तत्काळ हार्ट स्पेशालिस्टकडे नेण्यात आले. पण त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. देवयानी यांच्या मागे आई व भाऊ असा परिवार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.