Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली काँग्रेसची ईव्हीएम हटवा - लोकशाही वाचवा स्वाक्षरी मोहीम - सर्व प्रकारच्या निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात- - -पृथ्वीराज पाटील यांचा एल्गार

सांगली काँग्रेसची ईव्हीएम हटवा - लोकशाही वाचवा स्वाक्षरी मोहीम - सर्व प्रकारच्या निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात- - -पृथ्वीराज पाटील यांचा एल्गार
 

सांगली दि.९: ईव्हीम हटवा - लोकशाही वाचवा अभियानातर्गंत सर्व निवडणुका मतपत्रिकेवरच घेण्यात याव्यात यासाठी मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मित्र मंडळ चौक, मेन रोड सांगली येथे स. १० वा.  सह्यांची मोहीम आयोजित केली असून नागरिकांनी लोकशाही वाचवण्यासाठी मोठ्या संखेने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल केवल काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीसाठीच नाही तर राज्यातील जनतेसाठी धक्कादायक, अविश्वसनीय व अनाकलनीय आहेत.कोणतीही लाट नसताना लोकसभेच्या उलटे निकाल कसे काय लागू शकतात असा प्रश्न राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
 
विधानसभा निकालातील मतांच्या टक्केवारी तफावत गंभीर व चिंताजनक आहे.सर्व निवडणुका या मतपत्रिकेवरच घ्याव्यात यासाठी काँग्रेस पक्षातर्फे ५ लाख सहयांचे निवेदन मा.राष्ट्रपती, मा.पंतप्रधान, मा. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व मुख्य निवडणूक आयुक्त यांना अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मालिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात येणार असून ही सहयांची मोहीम ५ ते २० डिसेंबर या कालात देशात व राज्यभर राबवण्यात येणार असल्याची माहिती पृथ्वीराज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.