राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून उद्या रविवारी नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात होणार आहे. दरम्यान , मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी मुंबईत देखील घडामोडींना वेग आला आहे.
वर्षा निवासस्थानाच्या बाजूला असलेल्या मुक्तगिरी या बंगल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वास्तव्य करणार आहेत. उदय सामंत यांचं या बंगल्यात वास्तव होतं. आता हा बंगला एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे. त्यामुळे उदय सामंत यांनी बंगल्यातील आपलं सगळं सामान बाहेर काढल्याची माहिती समोर येत आहे. आता या बंगल्याचा ताबा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सामान हे मुक्तागिरी बंगल्यामध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नंदनवन बंगल्याची डागदुजी सुरू असल्याने, एकनाथ शिंदे मुक्तागिरी बंगल्यामध्ये वास्तव्य करणार आहेत, काम पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा नंदनवन या त्यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.