लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी ताडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अशा योजना जाहीर केल्या.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे अर्ज मागविताना सुरवातीला उत्पन्नाचा दाखल्यासह अन्य कागदपत्रांचे बंधन घातले. मात्र, मुदतीत कागदपत्रांची पूर्तता अशक्य असल्याने ही अट काढून टाकली. त्यानंतर केवळ रेशनकार्डची अट घातली. परंत, अर्जदारांच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न किती यासह अन्य निकषांची वेळेअभावी पडताळणी होवू शकली नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशिवाय अन्य कोणत्याही योजनांचे लाभार्थी एक कोटीपर्यंत नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील पावणे अकरा लाख महिलांसह राज्यातील अडीच कोटींहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले. विशेष म्हणजे प्रगतशील राज्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता लाभार्थीच्या अर्जांची फेरपडताळणी होऊन पात्र लाभार्थींना १ एप्रिलनंतर दरमहा २१०० रुपये मिळतील, असेही सांगितले जात
आहे.
दरवर्षी लागू शकतो ५६ हजार कोटींचा निधी
आता अडीच कोटींहून अधिक लाभार्थीना दरमहा २१०० रुपयांचा लाभ देण्यासाठी शासनाला दरवर्षी ५६ हजार कोटींचा निधी लागू शकतो. राज्याचे एकूण उत्पन्न व खर्चाचा हिशेब घातला तर एवढा निधी एकाच योजनेसाठी शक्य नसल्याची तिजोरीची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थींनाच योजनेचा लाभ मिळावा या हेतूने अर्जांची फेरपडताळणी होईल, असेही वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
निकषांची वेळेअभावी होवू शकली नाही पडताळणी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज केलेल्या अर्जदाराने अर्जात भरलेती माहिती अचूक आहे का, त्यांनी स्वयंघोषणापत्र भरून दिले आहे का अशा बाबींची पडताळणी तालुकास्तरीय समित्यांनी केली. अन्य बाबींची पडताळणी वेळेअभावी होऊ शकली नाही.
- विनायक मगर, तहसीलदार, अक्कलकोट
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.