Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्थेने सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले :-मा.आ.डॉ. सुरेशभाऊ खाडेशाखा आरग चे प्रशस्त आधुनिक कार्यालयात स्थलांतर समारंभ संपन्न

कर्मवीर पतसंस्थेने सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले :-मा.आ.डॉ. सुरेशभाऊ खाडे
शाखा आरग चे प्रशस्त आधुनिक कार्यालयात स्थलांतर समारंभ संपन्न

आरग :- कर्मवीर पतसंस्थेने केलेली प्रगती ही सभासदांना अभिमान वाटावी अशी असून कर्मवीर पतसंस्थेने आदर्श कामकाज करुन सभासदांचे आर्थिक हित साध्य केले आहे. यामध्ये कर्मवीर पतसंस्थेच्या संचालक मंडळाचे नियोजन सहायभूत ठरले असल्याची भावना आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केली. कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या.. सांगली च्या आरग ता. मिरज येथील शाखेचे प्रशस्त वास्तुत स्थलांतर मा.आ.डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचे अमृतहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. मा. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूपविले. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व कर्मवीर आण्णांच्या प्रतिमेचे पुजन संपन्न झाले.


कर्मवीर पतसंस्थेने ठेवी कर्जाची मोठी उंची गाठली आहे. त्यामुळे संस्थेने आता पुढील विचार करुन मोठ्या आर्थिक संस्थेचे स्वप्न पहायला हरकत नाही. संस्थेचे कार्य सर्वसमावेशक असल्यामुळे आम्ही संस्थेच्या पाठीशी उभे राहू असे आश्वासन आमदार डॉ.. सुरेशभाऊ खाडे यांनी दिले.

स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. संस्थेच्या कार्याची दिशा त्यांनी विपद केली. संस्था ६४ शाखा मधून सभासदांना विनम्र सेवा पुरवित असल्यामुळे आम्हाला कधीही ठेवी, कर्ज, भागभांडवल यासाठी जादा प्रयत्न करावे लागले नाहीत असे त्यांनी विषद केले. ६७००० सभासदांच्या माध्यमातून संस्थेच्या ठेवी रु. १२१२ कोटी असून रु.९०५ कोटीचे कर्ज वितरण केले आहे. यावेळी रावसाहेब पाटील यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

कर्मवीर पतसंस्थेने आदर्श कामकाजाचा परिपाठ घालून प्रगतीमध्ये सातत्य राखल्याचे मत अध्यक्षीय भाषणात आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास सरपंच सौ. मिनाक्षी वसंत कोरबू, सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. तुकाराम गोविंद गायकवाड, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रदिप शहा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. श्री. रावसाहेब पाटील यांनी जैन अल्पसंख्याक अर्थिक विकास महामंडळावर सदस्य म्हणुन निवड झाल्याबद्दल त्याचा आरग जैन समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. श्री. सागर वडगांवे यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला.

आरग शाखेचे सल्लागार श्री. बाबासो पाटील, श्री. अतुल शहा, श्री. सर्जेराव खटावे. श्री. अजित नाईक.

श्री. सुरज आरगे, श्री. विनायक कुंभार, श्री. प्रकाश गायकवाड यांचा सत्कार संचालक मंडळाच्या हस्ते तर मुख्यकार्यकारी

अधिकारी श्री. अनिल मगदुम. विभागीय अधिकारी श्री. विश्वास मोरे शाखाधिकारी श्री. अक्षय पाटील यांचा सत्कार प्रमुख

पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमास जेष्ठ नेते तुकाराम आत्माराम पाटील, जैन समाज अध्यक्ष श्री. संदेश पाटील, ग्रा.प.सदस्य श्री. सचिन पाटील, प्रकाश गायकवाड, अजित कांबळे खटावचे सदस्य रायगोंडा कांबळे, सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब ऐनापुरे, श्री. जिनेंद्र वडगांवे, शितल पाटील. उदय पाटील, निरंजन शेट्टी, आकाश शहा, प्रज्वल नवाळे, सचिन आरगे, डॉ. अनिल कोरबू, डॉ. विवेक जाधव, अशोक मगदुम लिंगनुर, वसंत कोरबू, गोविंद तात्या पाटील, शहाजी मेथे, कृष्णा मामा व्यंकोचीवाडी, नंदकुमार माळी, हणमंतराव गायकवाड, काकासो भोसले संतोषवाडी, विवेक शिंदे सलगरे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. श्री. तुकाराम गोविंद गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास संस्थेचे संचालक अॅड. एस. पी. मगदूम डॉ. रमेश वसंतराव ढबू.. श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, डॉ. एस.बी. पाटील (मोटके) श्री. ए. के. चौगुले (नाना) संचालिका भारती आप्पासाहेब चोपडे तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह संस्थेचे सभासद, सेवक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे यांनी मानले. सुत्रसंचलन संजय सासणे यांनी केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.