Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डंपरची दुचाकीला धडक, पती-पत्नी ठार; देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

डंपरची दुचाकीला धडक, पती-पत्नी ठार; देवदर्शन करून परतताना काळाचा घाला
 

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदी रस्त्यावरील यशोदा पूलाजवळ डंपरने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये पती-पत्नी ठार झाले. हा अपघात आज, सोमवारी सकाळच्या सुमारास झाला. या दुर्घटनेत पत्नी सुनीता संजय वडिंगे (वय ५५) या जागीच ठार झाल्या, तर पती संजय सदाशिव वडिंगे (५८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

देवदर्शन करून परतताना या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संजय वडिंगे हे होमगार्ड विभागाचे इचलकरंजी प्रमुख होते. १५ दिवसांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते. ते दररोज सकाळी पंचगंगा नदीकिनारी असलेल्या वरदविनायक मंदिरात दर्शनासाठी जात असत. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी देवदर्शन करून परतत असताना यशोदा पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला डंपर ने धडक दिली. अपघातात पत्नी सुनीता या जागीच ठार झाल्या. तर जखमी संजय यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला. 

अपघातामुळे यशोदा पूलाजवळ वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. मृत संजय वडिंगे यांचा मुलगा जेल पोलिस दलात कार्यरत आहे. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला असून पोलिसांनी डंपर जप्त करून गावाभाग पोलीस ठाण्यात आणला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.