पतीच्या जीवनशैलीएवढ्या 'पोटगी'ची अपेक्षा ठेवू नका; ५०० कोटींऐवजी दिले १२ कोटी
नवी दिल्लीः घटस्फोटानंतर आयुष्यभर पतीच्या जीवनशैलीसारखे जीवन जगता येईल, एवढी पोटगी मिळावी, अशी अपेक्षा घटस्फोटित पत्नी पतीकडून ठेवू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका घटस्फोटाच्या खटल्यात दिला आहे.
अमेरिकेत आयटी कन्सल्टन्सी सेवेचे मोठे साम्राज्य असलेल्या एका व्यावसायिकाशी संबंधित हा खटला आहे. त्याने पहिल्या पत्नीला ५०० कोटींची पोटगी नोव्हेंबर २०२० मध्ये करीत केवळ १२ कोटींची पोटगी दिली. दिली होती. त्यानंतर ३१ जुलै २०२१ रोजी दुसरे लग्न केले. मात्र, ते काही महिनेच टिकले. घटस्फोट मागताच या पत्नीनेही पहिल्या पत्नीप्रमाणे कायमस्वरूपी ५०० कोटी मागितले. मात्र, न्यायालयाने ही मागणी अमान्य करीत केवळ १२ कोटींची पोटगी दिली.
न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. पंकज मिथल यांनी विना अत महटले की, पोटगीत पहिल्या पत्नीची बरोबरी करणे चूक आहे. पहिली पत्नी अनेक वर्षे पतीसोबत होती. दुसरी पत्नी मात्र काहीच महिने सोबत राहिली आहे, ही बाब नजरेआड करता येणार नाही. नेहमी असे दिसून येते की, पतीची संपत्ती, जीवनशैली आणि उत्पन्न याच्या बरोबरीने पोटगी मागितली जाते. घटस्फोटानंतर पतीची सांपत्तिक स्थिती ढासळते, तेव्हा अशा मागण्या आश्चर्यकारकरीत्या गायब होतात?
महिलांना माहेरप्रमाणे जीवनशैलीचा हक्क
न्यायालयाने म्हटले की, स्थापित कायद्यानुसार, पत्नी तिच्या माहेरी ज्या जीवनशैलीशी परिचित आहे, तिच्याशी मिळती जुळती जीवनशैली मिळण्यासाठी पत्नी हक्कदार आहे. मात्र, घटस्फोटानंतर पती ज्या दर्जाचे जीवन जगतो, त्या दर्जासाठी आवश्यक पोटगीची अपेक्षा पत्नी ठेवू शकत नाही. पत्नीला आयुष्यभर बरोबरीचे जीवन जगता येईल, एवढ्या पोटगीचे बंधन घातल्यास पतीच्या वैयक्तिक विकासात बाधा येईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.