सांगली येथील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष,
तरुण भारत चे ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर यांना ईगल फाउंडेशनच्या वतीने
देण्यात येणारा राष्ट्रीय निर्भीड पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
शिवराज काटकर यांनी गेले 30 वर्ष पत्रकार क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी केली आहे. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे. ग्रामीण पत्रकार हा समाजात कणा आहे. पत्रकांराच्या कोणत्याही अडीअडचणीला न्याय देण्यासाठी त्यांचे आरोग्यासाठी सदैव तत्व असणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष, वैज्ञानिक तरुण भारत चे चिप रिपोर्टर शिवराज काटकर यांना राष्ट्रीय निर्भय पत्रकार पुरस्कार ईगल फाउंडेशनच्या वतीने व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने उपस्थित कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
ग्रामीण पत्रकार व शहरी पथकाच्या साठी विविध आरोग्य शिबिरे, पत्रकार कायदा, पत्रकार निधी लढ्याचे नेतृत्व , शेतकरी व नागरी सुविधा व गुन्हेगारी अभ्यासाचे सातत्यपूर्ण लिखाण, पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारालरील हल्ले याबाबत लढाई, राज्यस्तरीय अग्रलेख, पत्रकार साठी अविरत झटणारे नेतृत्व अशा विविध क्षेत्रातून सामाजिक कार्य करणारे तरुण भारत सांगलीचे चिप रिपोर्टर शिवराज काटकर यांना ईगल फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय निर्भीड पत्रकारिता पुरस्कार शिवराज काटकर यांना सहपत्नी कोल्हापूर येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अतिग्रे, कोल्हापूर मध्ये मानववरांच्या उपस्थिती प्रदान करण्यात आला.रविवारी संजय घोडावत इंटरनॅशनल इंटरनॅशनल स्कूल अतिग्रे, कोल्हापूर येथे माजी खासदार निवेदिता माने, उद्योजक एन.सी.संघवी, संनदी लेखापाल डॉ.शंकर अंदानी, कराडचे नेते प्रविण काकडे,ईगल फौंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, सौ .शालन कोळेकर , उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुडेलकर, तहसीलदार सुशील बल्हेकर, कोल्हापूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल उपाध्ये,संजय घोडावत युनिव्हर्सिटी चे प्राचार्य सह ,रवि हजारे सह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.