Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर ; वाचा कोण-कोण घेणार मंत्रिपदाची शपथ?

महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर ; वाचा कोण-कोण घेणार मंत्रिपदाची शपथ?
 

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर, राज्यात नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या ५ डिसेंबरला राज्यातील नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ कोण घेणार, याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्रवासियांसह देशाला लागली आहे.

तसेच यावेळी कुणाला लॉटरी लागणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.अशातच महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्हीपक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. 

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री
शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि शंभुराज देसाई हे मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, अदिती तटकरे, अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील शपथ घेणार आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने देखील जोरदार मुसंडी मारली आहे.
भाजपचे संभाव्य मंत्री
 
कोकण
रविंद्र चव्हाण
नितेश राणे
गणेश नाईक

मुंबई
मंगलप्रभात लोढा
आशिष शेलार
अतुल भातखळकर
पश्चिम महाराष्ट्र
 
शिवेंद्रसिंहराजे भोसले
गोपीचंद पडळकर
माधुरी मिसाळ
राधाकृष्ण विखे पाटील
राहुल कुल

विदर्भ
चंद्रशेखर बावनकुळे
सुधीर मुनगंनटीवार
संजय कुटे

राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार हे जरी जवळपास निश्चित झालं असलं तरी सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपकडे मुख्यमंत्रिपद राहणार आहे, हे आता निश्चित झालं आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीसांचं नाव आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत असलं तरी, जोपर्यंत नाव जाहीर होत नाही, तोपर्यंत भाजप कोणतं धक्कातंत्र अवलंबणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.