मुस्लिमांना दोन अपत्यांपेक्षा अधिक असतील तर त्यांना लाडकी बहिण योजनेतून वगळा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करणार असल्याचा शाब्दिक वार भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलायं.
बांग्लादेशात होत असलेल्या हिंदु समाजावरील अत्याचाराच्या विरोधात आज महाराष्ट्रात हिंदु समाजाकडून न्याय यात्रा काढण्यात आलीयं. सिंधुदूर्गमध्येही हिंदू समाजाकडून बांग्लादेशातील अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यात आलायं. या मोर्चादरम्यान, आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधलायं.
पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, मुस्लिमांना दोन अपत्यांपेक्षा जास्त अपत्य असतील तर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून वगळा. कारण मतदान करताना यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हिंदुत्ववादी सरकार नको आहे, पण अन्य वेळी प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेणारे मुस्लिम कुटुंब असतात. तुम्हाला जर तुमचा धर्मच महत्वाचा असेल तर लाभ का घेता? लाडक्या बहिणीच्या योजनेत सर्वाधिक मुस्लिमच दिसतात. माझी पंतप्रधान मोदींना विनंती आहे की, आदिवासी समाज वगळून मुस्लिम समाजात दोन पेक्षा अधिक अपत्य असतील तर त्यांना या योजनेतून वगळावं, जे लोकं सरकारला मतदान करतात, मोदींवर विश्वास ठेवतात त्यांना आमच्या योजनेचा लाभ भेटला पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
आम्हाला ठेचून संपवायला 5 मिनिटे खूप :
बांग्लादेशात हिंदुंवर अत्याचार करणाऱ्यांना ठेचून संपवायला आम्हाला 5 मिनिटे खूप आहेत. देशातील पोलिस बाजूला केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परवानगी दिली तर आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अन्याय करणाऱ्यांना ठेचून संपवायला 5 मिनिटेही खूप आहेत. बांग्लादेशात आमच्या धर्मगुरुंना मारण्यात येत आहे. त्यांची केस घेणाऱ्या वकीलांनाही मारण्यात येत आहे. बौद्ध मुर्त्यांची विटंबना केली जात आहे. बौद्ध समाजाला टार्गेट केलं जात आहे, उद्या ही गोष्ट देशातही घडू शकते, असं नितेश राणे म्हणाले आहेत.दरम्यान, सिंधुदूर्गात आज बांग्लादेशातील हिंदू समाजाचा आवाज बनून मोर्चा काढण्यात आलायं. ही हिंदु समाजाची न्याय यात्रा असून बांग्लादेशातील हिंदू समाज एकटा नाही त्यांच्यासोबत सिंधुर्दूर्ग आणि महाराष्ट्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास असून ते कुठल्याही हिंदुवर अत्याचार होऊ देणार नाहीत हाच संदेश सकल हिंदू समाजाकडून आम्ही पोहोचवत असल्याचंही नितेश राणेंनी स्पष्ट केलंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.