Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

झाकीर हुसैननंतर संगीतसृष्टीला आणखी एक मोठा धक्का, प्रसिद्ध गायकाचं निधन

झाकीर हुसैननंतर संगीतसृष्टीला आणखी एक मोठा धक्का, प्रसिद्ध गायकाचं निधन
 

ठाणे : प्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार उस्ताद झाकीर हुसैन यांचं काल निधन झालं. आता संगीत क्षेत्रातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गायक पंडित संजय राम मराठे यांचं निधन झालं आहे.

एका धक्क्यातून सावरत असताना संगीतसृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला. संगीत भुषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र गायक व हार्मोनियम ऑर्गन वादक पंडित संजय राम मराठे यांचे रविवारी रात्री दुःखद निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांना ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

68 व्या वर्षी गायक पंडित संजय राम मराठे यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात युवा तडफदार गायक भाग्गेश मराठे, प्राजक्ता मराठे, पत्नी, सूना नातवंडे असा परिवार आहे. संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या नुकत्याच जन्मशताब्दी निमित्त वर्षभर अनेक कार्यक्रमात त्यांचा मुख्य सहभाग होता. आपले धाकटे बंधू गायक मुकुंद मराठे यांच्यासह त्यांनी संगीत मंदारमाला हे संगीत नाटक जन्मशताब्दी वर्षात साकारले होते आणि आज देखील त्याचे प्रयोग जोरदार चालू आहेत. त्यांचे अंत्यविधी सोमवारी १६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता जवाहर बाग स्मशानभूमीत होणार आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.