Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नववर्षात सांगलीत हेल्मेटची सक्ती ?

नववर्षात सांगलीत हेल्मेटची सक्ती ?
 

सांगली :  राज्यातील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सांगली वाहतूक शाखेने तयारी सुरू केली आहे. नव्या वर्षात हेल्मेटची सक्ती होण्याची शक्यता आहे. दुचाकीस्वारासह सहप्रवाशांनाही हेल्मेट सक्तीचे केले जाणार आहे.

पोलिसांनी हेल्मेट वापराबाबत अनेकदा जनजागृती केली. न्यायालय व शासनानेही हेल्मेट वापराचे आदेश काढले, पण त्याची ठोस अंमलबजावणी झाली नाही.  नागरिकांनीही हे आदेश गांभीयनि घेतले नाहीत. दहा महिन्यांत जिल्ह्यात ३३४ अपघात झाले. यात चारचाकी, अवजड वाहने आणि दुचाकीचा समावेश आहे. या अपघातात ३६५ जणांचा बळी गेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत बळींची संख्या ७३ ने वाढली. गंभीर अपघात ४३२ झाले असून यात ६२१ जण जायबंदी झाले.

 

दरवर्षी अपघातातील बळींची संख्याही वाढत चालली आहे. बेदरकार वाहनचालक, हेल्मेट नसणे, भरधाव वेग, मोबाईलवर बोलणे, मद्यपान आदी कारणांनी अपघात वाढत आहेत. हेल्मेट सक्तीपूर्वी वाहनचालकांचे प्रबोधन वाहतूक शाखेकडून केले जाईल. वाहनचालकांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे.

वाहनचालकांत जागृतीची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच वाहतूक शाखेकडून मोहीम हाती घेतली जाणार आहे. प्रत्यक्षात हेल्मेटची सक्ती केली जाईल, असे सांगण्यात येते. त्यामुळे नव्या वर्षात जिल्ह्यात हेल्मेट सक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.