Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एकनाथ शिंदेंना धक्का, आमदाराने दिला तडकाफडकी राजीनामा

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एकनाथ शिंदेंना धक्का, आमदाराने दिला तडकाफडकी राजीनामा
 

नागपूर : महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार  आज नागपूरमध्ये होणार आहे. एकूण 39 आमदार आज मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीचे 9 असे एकूण 39 मंत्री शपथ घेणार आहेत.

मंत्रिमंडळाच्या यादीत आपला नंबर लागावा, यासाठी पक्षाच्या अनेक आमदारांनी शनिवारी रात्री उशीरपर्यंत फिल्डिंग लावली होती. त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांची यादी निश्चित केली असून यामध्ये धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याचा निर्णय अजित पवारांकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे.

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेतापदाचा राजीनामा दिला आहे. भोंडेकर यांनी फक्त उपनेते पदाचा नाही तर पक्षातील विविध पदांचा राजीनामा दिला आहे. मंत्रिपदासाठी वर्णी न लागल्याने भोंडेकर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा देखील त्यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही.

एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार?

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर नाराज आहेत. भोंडेकर यांनी शिवसेना पक्षाची जी संघनात्मक पदे होती त्या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. मंत्रिपद मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळावे अशी तेथील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र आता मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळत नाही हे दिसून आल्यानंतर भोर्डीकर यांना राजीनामा दिला आहे. याववर एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काही नवीन चेहऱ्यांना संधी
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. नव्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार? कोणाच्या वाट्याला कोणंत खात जाणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर आज मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त लागलं असून, नागपुरात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आतापर्यंत महायुतीमधील एकूण 39 आमदारांना फोन करण्यात आले आहेत. या मंत्रिमंडळ विस्ताराचं वैशिष्ट म्हणजे या मंत्रिमंडळामध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.