Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अखेर फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब! निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत मोठा निर्णय

अखेर फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब! निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत मोठा निर्णय
 
 
मुंबईः भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव विधीमंडळ गटनेता म्हणून निश्चित झालं आहे. त्यामुळे गुरुवारी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील.

भाजपची कोर कमिटीची बैठक संपली आहे. निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीला काहीच क्षणांमध्ये सुरुवात होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली बैठक. याच बैठकीत गटनेता म्हणून फडणवीसांची निवड होईल.

देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री म्हणून भाजपने जवळपास निश्चित केलं होतं. परंतु एकनाथ शिंदे यांच्या कथित नाराजीमुळे भाजपने त्यांचं नाव जाहीर केलेलं नव्हतं. शेवटी शिंदेंनी गृहमंत्री पदाची मागणी लावून धरली होती. त्याबाबत भाजप काय निर्णय घेणार, हे लवकरच कळेल. मात्र मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच शपथ घेतील, हे निश्चित झालं आहे.
लाडक्या बहिणींच्या साक्षीने शपथविधी होणार

महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'लाडक्या बहिणी' शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. शपथविधीच्या ठिकाणी 'लाडकी बहीण कक्ष' उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी १० हजार महिलांची बसण्याची व्यवस्था केली आहे. सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे.

भाजपकडून महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे निमंत्रण
योगी आदित्यनाथ - मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

चंद्राबाबू नायडू - मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश

नितीन कुमार - मुख्यमंत्री, बिहार

प्रेमा खांडू - मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश

हिमंत बिश्व शर्मा - मुख्यमंत्री, आसाम

विष्णूदेव साय - मुख्यमंत्री, छत्तीसगढ

प्रमोद सावंत - मुख्यमंत्री, गोवा

भूपेंद्र पटेल - मुख्यमंत्री, गुजरात

नायब सिंग सैनी - मुख्यमंत्री, हरियाणा

मोहन यादव - मुख्यमंत्री, मध्य प्रदेश

कॉनराड संगमा - मुख्यमंत्री, मेघालय

भजनलाल शर्मा - मुख्यमंत्री, राजस्थान

मानिक साहा - मुख्यमंत्री, त्रिपुरा

पुष्कर सिंग धामी - मुख्यमंत्री, उत्तराखंड

नामदेव शास्त्री, भगवानगड

राधानाथ स्वामी महाराज, इस्कॉन

गौरांगदास महाराज, इस्कॉन

जनार्दन हरीजी महाराज

प्रसाद महाराज अंमळनेरकर

मोहन महाराज

जैन मुनी लोकेश

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.