Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बिग ब्रेकींग! चंद्रशेखर बावनकुळेंसह महायुतीच्या ६ आमदारांची आमदारकी रद्द

बिग ब्रेकींग! चंद्रशेखर बावनकुळेंसह महायुतीच्या ६ आमदारांची आमदारकी रद्द
 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सहा आमदारांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने याबाबत अधिसूचना काढली असून, ही कारवाई गंभीर कारणांमुळे नसून नियमानुसार करण्यात आली आहे.

एका व्यक्तीला एकाचवेळी दोन्ही सभागृहांचे सदस्य होता येत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रशेखर बावनकुळे – कामठी विधानसभा मतदारसंघातून विजयी, गोपीचंद पडळकर – जत मतदारसंघातून निवडून आले, प्रवीण दटके – नागपूर मध्य मतदारसंघातून विजय, आमश्या पाडवी – अक्कलकुवा मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार राजेश विटेकर – अजित पवार गटाचे सदस्य, पाथरी विधानसभा मतदारसंघातून विजयी,रमेश कराड – भाजपचे आमदार, लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवड

या सहाही आमदारांचे 23 नोव्हेंबरपासून विधान परिषद सदस्यत्व रद्द करण्यात आले असून, आता ते विधिमंडळाच्या विधानसभेत सदस्य म्हणून दाखल होतील. विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल 12 दिवसांनी आज महायुती 2.0 सरकारचा शपथविधी होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सायंकाळी सडेपाच वाजता शपथ घेतील. या सोहळ्यासाठी तीन भव्य मंच उभारण्यात आले असून भगव्या रंगाचा विशेष वापर करण्यात आला आहे.कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

संविधानाच्या नियमानुसार, कोणत्याही व्यक्तीला एकाचवेळी विधान परिषद आणि विधानसभेचे सदस्य होता येत नाही. त्यामुळे विधानसभेत निवडून आलेल्या सहाही आमदारांना विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची गरज होती. विधिमंडळ सचिवालयाने त्यानुसार त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. महायुती सरकारच्या शपथविधीनंतर राज्यातील प्रशासन सुरळीतपणे चालवण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांच्या सहभागाने सरकारची पुढील धोरणे ठरवली जातील.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.