Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धनंजय मुंडे खातेवाटपापूर्वीच मिळणार नारळ? छगन भुजबळ वर्णी लागणार

धनंजय मुंडे खातेवाटपापूर्वीच मिळणार नारळ? छगन भुजबळ वर्णी लागणार
 

नागपूर : सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून वातावरण तापले आहे. यामध्ये परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वाल्मीक कराड याचाही कथित सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 

केज तालुक्यातील अवादा एनर्जी कंपनीचे काम सुरू ठेवण्यासाठी हात-पाय तोडण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मीक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने सीडीआर तपासण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले तसेच एनसीपी एसपीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.