पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून सॉफ्टवेअर इंजिनीअर अतुल सुभाष यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी सुभाष यांनी सुसाईड नोट व व्हिडिओ करत अनेक आरोप केले होते. देशात पुरुषांसाठी कायदेच नसल्याचा आरोप सुभाष यांनी केला होता. या प्रकरणी नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यावर गुन्हा दाखल झाला असून पत्नी, सह तिच्या आणि भावाला अटक करण्यात आली आहे. आता सुसाइड नोटमध्ये नाव असलेल्या जज रिता कौशिक यांच्यावर बेंगरुळू पोलिस कारवाई करण्याच्या तयारीत आहे. यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहे.
उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश रीता कौशिक या खटल्याच्या सुनावणी दरम्यान, अतुल सुभाष यांच्यावर हसल्या असून त्यांना पैसे देता येत नसेल तर जीव द्या असे म्हटले होते. सुभाष यांनी त्यांच्या नोटमध्ये जज कौशिक यांनी देखील छळ केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, शनिवारी पोलिसांनी अतुलची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया आणि मेहुणा अनुराग सिंघानिया यांना अटक केली आहे. त्यानंतर आता जज सरिता कौशिक यांच्या अडचणी वाढणार आहे.
एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सोमवारी एका वृत्त वाहिनीशी बोलतांना या बाबत माहिती दिली. ते म्हणाले, "आम्ही न्यायाधीशांसह डेथ नोटमध्ये नमूद केलेल्या सर्व आरोपांची चौकशी करू. तपास अधिकाऱ्याला या प्रकरणाचा तपास करण्याचे सर्व अधिकार आहेत. मात्र, कारवाई करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अतुल यांनी सुसाईड नोटमध्ये न्यायाधीशांवर लाचखोरीचे अनेक गंभीर आरोप केले आहेत.
सुसाईड नोटमध्ये अतुलने २१ मार्च २०२४ च्या एका घटनेचा उल्लेख केला आहे. हे प्रकरण न्यायाधीश कौशिक यांच्या दालनात होते. चिठ्ठीत अतुल ने आपण आणि पत्नी निकिता न्यायाधीशांच्या दालनात उपस्थित असल्याचे नमूद केले होते. दरम्यान, कोर्टात आणखी पैसे देण्यास असमर्थ असल्याचं अतुलच्या अतुलने कोर्टात सांगितलं होतं. यावर त्याची पत्नी निकिता म्हणाली पैसे देता येत नसेल तर 'तू आत्महत्या का करत नाहीस. तिच्या या वाक्यावर कारवाई करण्या एवजी जज रिता कौशिक या हसल्या होत्या. याआधी सुभाष जज यांना उद्देशून म्हणाले की, "मॅडम, एनसीआरबीची आकडेवारी पाहिली तर खोट्या केसेसमुळे लाखो लोक आत्महत्या करत असल्याचं सिद्ध झालं आहे. यावर जज यांनी कोणतहीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
अतुल सुभाष यांनी ९ डिसेंबर रोजी बंगळुरूयेथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यापूर्वी त्याने २४ पानांची सुसाईड नोट व दीड तासाचा व्हिडिओही सोशल मीडियावर अपलोड केला होता. यात त्याने पत्नी निकिता, आई निशा, भाऊ अनुराग आणि काका सुशील सिंघानिया यांचा उल्लेख करत पैशांसाठी छळ करत असल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. या चिठ्ठीत त्यांनी न्यायाधीश कौशिक यांच्यावर देखील पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता.
आरोपींना अटक
अटक करण्यात आलेल्या आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना बेंगळुरूला आणण्यात आले आहे. पत्नी निकिता, तिची आई निशा व तिचा भाऊ अनुराग यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, काका सुशील सिंघानिया यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.