Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लालकृष्ण आडवाणी रुग्णालयातच; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती, 'दोन दिवसात..'

लालकृष्ण आडवाणी रुग्णालयातच; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती, 'दोन दिवसात..'
 

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा बिघडली असून, या कारणास्तव त्यांना दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लालकृष्ण अडवाणी 97 वर्षांचे आहेत. गेल्या 4-5 महिन्यांत त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागले. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 26 जून रोजी रात्री 10.30 वाजता त्यांना दिल्ली एम्सच्या युरोलॉजी विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आता 12 डिसेंबर रोजी त्यांना पुन्हा दिल्लीतील अपोल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

मात्र त्यांना नक्की काय होतंय याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर काल (मंगळवारी) संध्याकाळी हॉस्पिटलतर्फे आडवणी यांच्याबद्दल हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आलं. सध्या लालकृष्ण अडवाणी हे आयसीयूमध्ये डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. त्यांच्या तब्येतीच्या प्रगतीनुसार त्यांना पुढील 1-2 दिवसांत ICU मधून हलवले जाण्याची शक्यता आहे. असे त्या बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आलं. 

 

यापूर्वी ऑगस्ट महिन्यात देखील आडवाणी यांनी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि तेव्हाही ते न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सूरी यांच्या ऑब्झर्वहेशनखाली होते. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. लालकृष्ण अडवाणी हे गेल्या काही काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांशी झुंजत होते. त्याच वर्षी त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्नही देण्यात आला. आरोग्याच्या समस्यांमुळे ते राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना त्यांच्या निवासस्थानीच भारतरत्न प्रदान करण्यात आला.

कराचीमध्ये झाला जन्म

लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची येथे झाला. 1942 मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले. 1986 ते 1990, पुन्हा 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005 या काळात ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. याशिवाय ते सर्वाधिक काळ पक्षाचे अध्यक्ष राहिले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते गृहमंत्री आणि उपपंतप्रधानही होते.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.