महिलेच्या पित्ताशयात असंख्य खडे, तब्बल १२३५ खडे काढले, डॉक्टरही चक्रावले
भोपाळ : मध्यप्रदेशात डॉक्टरांनाही चक्रावून टाकणारा अजब प्रकार समोर आला आहे. महिलेच्या पित्ताशयात असंख्य खडे आढळून आले आहेत. दीर्घकाळापासून पोटदुखीपासून त्रस्त असणाऱ्या महिलेच्या शस्त्रक्रियेदरम्यान पित्ताशयात तब्बल १२३५ खडे आढळून आल्याने डॉक्टरही थक्क राहिले आहेत.
वृत्तानुसार, प्रतिमा गौतम या महिलेला दीर्घकाळापासून पोटदुखीचा त्रास जाणवत होता. प्रकृती गंभीर होताच प्रतिमाला मध्यप्रदेशातील रिवानजीक असणार्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रतिमाचे सिटीस्कॅन केले असता डॉक्टरांना तिच्या पित्ताशयात अनेक खडे असल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी तात्काळ तिची शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. डॉक्टर ब्रिजेश सिंह आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.
डॉक्टर ब्रिजेश सिंह यांनी या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, आम्ही ऑपरेशन सुरु केले. ऑपरेशनमध्ये आम्ही एक एक करुन चक्क १२३५ खडे बाहेर काढले आणि सर्वेच खडे हे लहान अशा मसुर डाळीच्या आकाराचे होते. पुढे त्यांना काही गंभीर समस्या उद्भवू नये यासाठी तिचं पित्ताशय काढून टाकावं लागलं. त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. 'शस्त्रक्रियेनंतर प्रतिमा आता पूर्णपणे निरोगी आहे. त्यांना आता पोटदुखीपासून दिलासा मिळाला आहे. पित्ताशयात एवढ्या मोठ्या प्रमाणात खडे आढळून आल्याची घटना यापूर्वी कधीही पाहिली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.महिलेच्या उपचाराचा संपूर्ण खर्च आयुष्मान कार्ड अंतर्गत मोफत करण्यात आला, त्यामुळे कुटुंबाला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले नाही. आता प्रतिमा आणि तिचे कुटुंब आनंदी आहे. याआधी रेवा येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागात गुंतागुंतीच्या प्रक्रियेद्वारे रुग्णाच्या हृदयात सीआरटीडी मशीनचे रोपण करून रुग्णाचा जीव वाचला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.