Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री मदन पवार यांना ईगल फौंडेशनच्या वतीने राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले.

फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  श्री मदन पवार यांना ईगल फौंडेशनच्या वतीने राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले.
 

मदन पवार यांनी त्यांना मिळालेला राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार २०२४ दानशूर उद्योगपती स्वर्गीय रतन टाटा त्यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित केला.  संजय घोडावत विद्यापीठामध्ये रविवार दि.८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे माजी खासदार निवेदिता माने,उद्योजक श्री एन.सी.संघवी,डॉ.शंकर अंदानी,श्री प्रविण काकडे,श्री सुर्यकांत तोडकर - विश्वस्त डॉ.डी.वाय पाटील शिक्षण समुह, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, हातकणंगलेचे तहसिलदार सुशिल बेलेकर ईगल फौंडेशनचे प्रेसिडेंट श्री विलासराव कोळेकर यांच्यासह

या कौतुक सोहळ्यास कोल्हापूर प्रबुद्ध भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अर्दाळकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री.बी.जी.काका पाटील, वशीचे गावचे फौजी संजय जाधव, प्रतापराव पाटील, वाघवाडी 'विरासत मिसळचे' मालक दीपक वाघ, पेठ चे वर्गमित्र से.नि. नायब तहसीलदार श्री नारायण पेठकर , डॉ. मुसा जमादार, रघुनाथ पाटील, ताजुद्दीन जकाते, अंबरनाथ कांबळे, सी.आर. सांगलीकर फाऊंडेशनचे संचालक श्री अमोल कांबळे,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री जितेंद्र पवार, निवृत्त पोलीस अधिकारी आनंदा (बापू) पवार,सुभाष कांबळे आणि अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाची नावलौकिक मिळवलेली वक्ता- विद्यार्थिनी कु.श्रद्धा पुजारी आणि तिची आई सौ स्वाती, वडील श्री मानाप्पा  पुजारी  आणि मदन पवार यांची पत्नी सौ शीला, त्यांची अत्या सौ.विजयमाला, वहिनी सौ.नीता आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी कार्यक्रम सोहळा संपल्यानंतर विद्यापीठातच श्री मदन पवार यांचा वैयक्तिक सत्कार करून शुभेच्छा दिल्या!




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.