वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
अजूनही बहुतांश व्यक्तींना मालमत्तेशी संबंधित काही गोष्टींची पुरेपूर माहिती नसते. माहिती नसल्यामुळे काही व्यक्तींच्या हातून फार मोठ्या चुका होतात. या चुका तुमच्यावर पश्चातापाची वेळ आणून ठेवतात.
अशावेळी मालमत्ता कायद्यासंबंधीत गोष्टींची माहिती प्रत्येक व्यक्तीकडे असणे अत्यंत गरजेचे आहे. मालमत्तेची निगडित आणखीन एक मुद्दा म्हणजे वडीलोपार्जित संपत्तीवर अधिकार. या मुद्द्यामध्ये तुम्ही तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीवर किती वर्षांमध्ये दावा करू शकणार आहात हे तुम्हाला ठाऊक आहे का. कारण की वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क सांगण्यासाठी, दावा ठोकण्यासाठी एक विशिष्ट वेळ दिला गेला आहे.
दावा करण्याचा कालावधी :
मालमत्ता संबंधित विषयातील वडीलोपार्जित संपत्तीच्या मुद्द्यावर बोलायचे झाले तर, तुम्ही तुमच्या वडिलांच्या मालमत्तेवर अवघ 12 वर्षांमध्ये दावा करू शकता. तुम्हाला मालमत्तेतून वगळले गेले आहे किंवा अशाप्रकारेचे कृत्य कृत्य तुम्हाला आढळून आले तर तुम्ही लगेचच न्यायालयात धाव घेऊन 12 वर्षांच्या आत दावा ठोकून न्याय मागू शकता.
दिलेल्या कालावधीत व्यक्तीने वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क सांगितला नाही तर, मालमत्ता कायद्यांच्या नियमानुसार त्या व्यक्तीला प्रॉपर्टी मध्ये जागा नाही किंवा त्याचा वडिलांच्या संपत्तीवर कोणत्याही प्रकारचा हक्क नाही.
वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे नेमकं काय :
तुमचे पणजोबा, आजोबा किंवा तुमच्या वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीला वडिलोपार्जित मालमत्ता असे म्हणतात. वडिलोपार्जित मालमत्ता केवळ तोपर्यंतच राहील जोपर्यंत मालमत्तेत विभागणी केली जाणार नाही. एकदा का मालमत्तेची विभागणी झाली तर, ती संपत्ती वडिलोपार्जित नसेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.