Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंत्री नितेश राणेंना भर सभेत घातली कांद्याची माळ; शेतकऱ्याला घेतलं ताब्यात

मंत्री नितेश राणेंना भर सभेत घातली कांद्याची माळ; शेतकऱ्याला घेतलं ताब्यात
 

कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने भर सभेत बोलत असताना मंत्री नितेश राणे यांनी कांद्याची माळ घातली. तसेच शेतकऱ्याने माईकवर बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात मंत्री नितेश राणे आले होते. तेव्हा भर सभेत बोलताना कांदा उत्पादक शेतकऱ्याने त्यांच्या गळ्यात कांद्याची माळ घातली आहे. यानंतर नितेश राणे यांनी शेतकऱ्याला थांबवा आणि त्याच्या समस्या ऐकून घेऊ असे सांगितलं. शेतकऱ्याने माईकवर बोलण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले.


कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका

कांद्याचे दर घसरत असल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. देशांतर्गत वाढलेली कांद्याची आवक व कांदा निर्यातीत येणारे अडथळे यामुळे कांद्याचे भाव घसरले आहेत. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. यासाठी शेतकऱ्यांकडून कांदा निर्यातशुल्क मागे घेण्याची मागणी देखील केली जात आहे.

सध्या नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या दरात घसरण सुरुच आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत कांद्याचाजास्तीत जास्त दर 2 हजार 800 रुपये मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.