Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

न्यायाधीशांच्या घराणेशाहीला पायबंद घालणार; न्यायाधीशांच्या नातेवाईकांना न्यायाधीश बनण्यापासून रोखणार; सुप्रीम कोर्ट

न्यायाधीशांच्या घराणेशाहीला पायबंद घालणार; न्यायाधीशांच्या नातेवाईकांना न्यायाधीश बनण्यापासून रोखणार; सुप्रीम कोर्ट


नवी दिल्ली : न्यायाधीशांच्या घराणेशाहीला प्रतिबंध घालण्याबाबत सुप्रीम कोर्टात गांभीर्याने विचार सुरू आहे. कारण उच्च न्यायालय व सुप्रीम कोर्टात न्यायाधीश नेमताना पहिल्या पिढीतील वकिलांचा विचार होत असल्याची धारणा समाजात बनत आहे.

ही धारणा दूर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे न्यायवृंद (कॉलेजियम) विचार करत आहे.

उच्च न्यायालयात किंवा सुप्रीम कोर्टात ज्या व्यक्तीचे नातेवाईक न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत किंवा होते त्या उमेदवाराच्या नावाची न्यायवृंदाकडून शिफारस केली जाण्याची शक्यता आहे. हे घडल्यास न्यायाधीशांची निवड करणाऱ्या न्यायवृंद प्रक्रियेत मोठे बदल होतील. न्यायाधीशांमध्ये असे अनेक लोक आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक हे कायद्याशी संबंधित होते किंवा आहेत.

न्यायवृंदातील काही न्यायाधीशांचा प्रस्ताव होता की, ज्या उमेदवाराचे नातेवाईक न्यायाधीश आहेत किंवा होते. त्यांची नावे पुढे करू नयेत. याबाबत व्यापक चर्चा झाल्यानंतर असा निर्णय घेतल्यास पात्रता असलेल्या अनेक जणांना नाकारले जाऊ शकते. पण, पात्रता असलेले लोक यशस्वी वकील म्हणून जीवन जगू शकतात. त्यांच्याकडे संधी कधीच कमी नसतील. काही जणांसाठी हा निर्णय नुकसानदायक ठरेल. पण, व्यापक हित पाहता हा निर्णय चुकीचा नाही.

न्यायाधीश नियुक्ती प्रक्रियेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाला विरोध केला होता व याबाबतचा सरकारचा आदेश रद्दबातल केला होता. आता न्यायवृंदाकडून स्वत:हून न्यायाधीशांची नियुक्ती प्रक्रियेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.