Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक ! मंदिर परिसरातच महिलेवर बलात्कार; व्हिडीओही बनवला, आठ आरोपींना अटक

धक्कादायक ! मंदिर परिसरातच महिलेवर बलात्कार; व्हिडीओही बनवला, आठ आरोपींना अटक
 

मंदिर परिसरातच एका महिलेवर बलात्कार करत त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. आसामच्या गुवाहाटी शहरातील एका मंदिरात ही घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार, १७ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ बनवत तो सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ स्थानिक पत्रकाराने गुवाहाटीच्या पोलीस आयुक्तांना पाठवला होता. त्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत, गुन्हा नोंदवून घेतला. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथकांची नियुक्त केली.

गुवाहाटी पोलीस आयुक्त दिगंत बराह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पोलिसांच्या दोन्ही पथकांनी शहरातील गोरचूक आणि जालुकबारी भागात छापेमारी केली. तसेच आरोपींची ओळख पटवत त्यांना अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी १८ ते २३ वयोगटातील असल्याचे माहिती आहे. अन्य एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, १७ नोव्हेंबर रोजी रास उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोपींनी एका महिलेला फूस लावून मंदिर परिसरातील निर्जनस्थळी नेलं. याठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. इतकच नाही, इतर आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ बनवत तो सोशल मीडियावर शेअर केला.

याप्रकरणी आतापर्यंत ९ जणांची ओळख पटवण्यात आली असून ८ जणांना अटक करण्यात आली आहे. एक व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, महिलेचीही ओळख अद्याप पटली नसून तिचाही शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.