सणासुदीचे दिवस सुरु होताच वस्तू विक्रीला सुरुवात होते. प्रत्येक ब्रँड ग्राहकांना स्वतःचे पॅकेज ऑफर करतो आणि त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. मग तो इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा ब्रँड असो किंवा कपडे तसेच शूजची विक्री असो.
जग बऱ्यापैकी प्रगत झाले असले तरी आता माणसांचीही वस्तूंसारखी विक्री होत आहे आणि ते स्वतः स्वतःचे दर ठरवतात. एका रिपोर्टनुसार, अमेरिकेतील मियामी येथे राहणाऱ्या जेसेनिया रेबेका नावाच्या मुलीने सोशल मीडियावर रेट कार्ड पोस्ट करून गर्लफ्रेंड पॅकेजची घोषणा केली आहे. तिने सांगितले आहे की,रकमेनुसार ती सणांच्या काळात अविवाहित मुलांची मैत्रीण बनून त्यांना मदत करेल.
तुम्हाला ख्रिसमससाठी घरी घेऊन जायचे असेल तर मी तयार
२९ वर्षीय जेसिका Jessenia Rebecca रेबेकाच्या मते, ती सिंगल मुलांसाठी ख्रिसमस गर्लफ्रेंड पॅकेज घेऊन येत आहे. तिची जाहिरातही तिने सोशल मीडियावर टाकली आहे. त्यानुसार, एका तासासाठी गर्लफ्रेंड म्हणून काम करण्यासाठी मुलगी १५० डॉलर म्हणजेच १२ हजार 701 रुपये आकारत आहे. जर कोणी सिल्वर पॅकेज घेतले तर त्याला २५० डॉलर म्हणजेच २१ हजार रुपये व रेबेकाला गिफ्ट द्यावे लागेल. गोल्ड पॅकेज घेणाऱ्यांसाठी हे शुल्क $450 म्हणजेच ३८ हजार रुपये होईल. तर प्लॅटिनम पॅकेज घेणाऱ्या व्यक्तीला $600 पेक्षा जास्त म्हणजेच ५० हजार रुपये द्यावे लागतील.
तुम्हाला कोणत्या सेवा मिळतील?
सिल्व्हर पॅकेजमध्ये, Jessenia Rebecca ती ग्राहकासोबत त्याच्या कुटुंबीयांसमोर येईल , जेवण करेल व गोड बोलेल. सोन्याचे पॅकेज घेणाऱ्यांसाठी रेबेका ३ तास सेवा देईल आणि कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होईल. या जोडप्याच्या भेटीची सुंदर गोष्टही ती त्यांना सांगणार आहे. प्लॅटिनम पॅकेज घेणाऱ्या ग्राहकासोबत रेबेका ६ तास राहणार आहे व कुटुंबासमोरही त्याचे प्रेम व्यक्त करेल. पैसे वाढले तर रात्रीच्या जेवणानंतर भांडी धुण्यासही ती तयार आहे. सोशल मीडियावर,या सेवेबद्दल वाचल्यानंतर लोकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. काहींनी याला स्कॅम तर काहींनी चांगली सेवा म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.