३० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात महसूल सहायक एसीबीच्या जाळयात, गुन्हा दाखल
नाशिक :- तक्रारदार यांच्या पक्षकाराच्या बाजूने निकाल लाऊन दिल्याचे मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाचे महसूल सहायक कैलास वैरागे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईबाबत दिलेली माहिती की, तक्रारदार हे व्यवसायाने वकील असुन त्यांचे पक्षकार यांनी विभागीय आयुक्त कार्यालय नासिक येथे दाखल केलेल्या पुर्न निरिक्षण दाव्याचा निकाल तक्रारदार यांच्या पक्षकारांच्या बाजूने लाऊन देण्याचे व नंतर लागलेला निकाल जाणीवपूर्वक विलंबाने अपलोड करून तो तक्रारदार यांच्या पक्षकाराच्या बाजूने लाऊन दिल्याचे मोबदल्यात वेळोवेळी फोनवरून तक्रारदार यांच्याकडे ३० हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. म्हणून आलोसे यांचे विरुध्द नासिक रोड पोलीस स्टेशन, नाशिक शहर, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, ७ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.