Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शाळेत घुसून मुलीला घेऊन गेला अन्.; पुण्यातील संतापजनक प्रकार

शाळेत घुसून मुलीला घेऊन गेला अन्.; पुण्यातील संतापजनक प्रकार
 

पुणे : छेडछाड काढणाऱ्या तरुणांना पालकांनी समज दिल्यानंतर देखील शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सहकारनगर परिसरात घडला आहे. मुलीला शाळेच्या वर्गातून बोलवून जबरदस्तीने गाडीवर बसवून नेत तिच्याशी अश्लील कृत्य करण्यात आले.

तर, तिला आणि तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देखील दिल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी १८ वर्षीय दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला. याबाबत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडीत मुलगी एका शाळेत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून तिचा एक मुलगा पाठलाग करत होता. मुलीला अडवून "तू मला आवडते. माझ्यासोबत बोलली नाही, तर समाजात तुझी बदनामी करेल", अशी धमकी त्याने दिली होती. यामुळे मुलीने पालकांना याची माहिती दिली होती. पालकांनी मुलाला व त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एका मुलाला समज दिली. शनिवारी (७ डिसेंबर) पिडीत मुलगी शाळेत होती. तेव्हा दोघे शाळेत गेले. मुलीला शाळेबाहेर बोलाविले. मुलीला दुचाकीवरुन शाळेच्या परिसरातील मोकळ्या जागेत नेले. तेथे त्यांनी मुलीशी अश्लील कृत्य केले. दुसऱ्याने मोबाइलवर फोटो काढले. नंतर तिला कोणाला काही सांगितल्यास सोशल मिडीयात फोटो व्हायरल करू तसेच तुला आणि तुझ्या भावाला जिवे मारू अशी धमकी दिली. त्यांच्या धमकीमुळे घाबरलेल्या मुलीने अखेर पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.