Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

.म्हणून मी शपथविधीला आलो नाही, शरद पवारांचा मोठा खुलासा

.म्हणून मी शपथविधीला आलो नाही, शरद पवारांचा मोठा खुलासा
 
 
देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यंमत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या या शपथविधी सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्री तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते मात्र या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते.

 
मात्र आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नसल्याचे खरे कारण शरद पवार यांनी सांगितले आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता मात्र संसदेचे अधिवेशन सुरू होतं ते सोडून येणं शक्य नव्हतं म्हणून मी आलो नाही. असा खुलासा त्यांनी यावेळी केला तसेच विधानसभा विरोधी पक्ष नेत्याबद्दल विधानसभा निर्णय घेईल याबाबत आम्ही काय सांगायचं. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी ईव्हीएम आंदोलनाबाबत देखील माहिती दिली आहे. ईव्हीएमबाबत आमची चर्चा सुरु असून लवकरच याबाबत पुढील दिशा ठरवू आणि तुम्हाला सांगू असं शरद पवार म्हणाले.

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी आयुष्यभर काम केलं. पिचड आजारावरती मात करतील असा आम्हाला विश्वास होता. त्यांनी राष्ट्रवादीच्या सुरुवातीच्या काळामध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती आणि अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी काम केला. त्यांनी सरकारमध्ये अनेक खाती संभाळली आणि आदिवासी भागात त्यांनी साखर कारखान्याची उभारणी केली. एका चांगल्या सहकाऱ्याला आज आम्ही मुकल्याच आम्हाला दुःख आहे त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्यासाठी परमेश्वर त्यांन शक्ती देवो हीच प्रार्थना असं शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.