Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'जज साहेब, प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोल टाकलं', पोलिसांची थर्ड डिग्री, कोर्टात आरोपी कोसळला

'जज साहेब, प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोल टाकलं', पोलिसांची थर्ड डिग्री, कोर्टात आरोपी कोसळला
 

गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी थर्ड डिग्री टॉर्चर केलं. मला जबर मारहाण आणि शिवीगाळ केली, असं सांगत चोरीच्या प्रकरणातील एक आरोपी न्यायालयात जोरजोरात रडू लागला. यामुळे काही काळ न्यायालयातील वातावरण गंभीर बनले. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. बिहारमधील एका न्यायालयात शनिवारी हा प्रकार घडला.

 

बिहारमधील भागलपूर न्यायालयात शनिवारी विचित्र प्रकार पाहायला मिळाला. चोरी प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. आरोपीला हजर करण्याची वेळ येताच, आरोपी न्यायाधीशांसमोर जोरजोरात रडू लागला. त्याने सांगितले की, गुन्ह्याची कबुली देण्यासाठी मला पोलिसांनी थर्ड डिग्री टॉर्चर केले. गुन्हा कबूल केल्यानंतरही दोन तास पोलीस मला मारहाण करत होते. माझ्या गुप्तांगात पेट्रोल टाकण्यात आले. तसेच मला आई-बहीणीवरून शिवीगाळ करण्यात आली. पीडित आरोपीच्या तक्रारीवरून न्यायाधीशांनी वैद्यकीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. एसपी (शहर) डॉ. के. रामदास यांनी देखील या प्रकरणाचा तपास करण्यास सांगितले. ते म्हणाले की, "आरोपीनं केलेले आरोप खूप गंभीर आहेत. तपासात जे पोलीस कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई करण्यात येईल."

 

अकबरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 8 डिसेंबर रोजी एक साखळी चोरीबाबत तक्रार दाखल झाली होती. चोराने चोरलेल्या फोनमधून एक लाख रुपयांचं ट्रॅन्झेंक्शन केल्याचा देखील आरोप होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत तरुण रोशन झा आणि त्याच्या एका मित्राला अटक केली होती. रोशनने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला जबर मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्याने गुन्हा कबूल केला. तरी देखील पोलिसांनी त्याला थर्ड डिग्री टॉर्चर केले आणि त्याच्या गुप्तांगात पेट्रोल ओतले. तसेच आई-बहिणीवरून शिवीगाळ केली.

एसीजेएम न्यायालयात हजर केलं असता, आरोपी रोशन झा याने अशा प्रकराचे आरोप केल्यानंतर काही वेळ न्यायालयात सन्नाटा पसरला. आरोपीची स्थिती पाहून न्यायालयाने तात्काळ वैद्यकीय समिती गठीत करून तपास करण्याचे आदेश दिले. या प्रकरणामुळे पोलिसांच्या कारभाराबाबत चर्चा सुरू आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.