कोल्हापूर : अनैसर्गिक कृत्याबद्दल शिक्षक जेरबंद
कोल्हापूर : कसबा बीड (ता. करवीर) येथील यू. व्ही. निवासी अॅकॅडमीतील एका शाळकरी मुलासोबत शिक्षकानेच अनैसर्गिक कृत्य केल्याचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीला आला. करवीर पोलिसांनी शिक्षक प्रदीप कृष्णात नलवडे (33, रा.कसबा बीड, मूळ धामोड, ता. राधानगरी) यास अटक केली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा आणि केंद्रीय शाळा प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या निवासी अॅकॅडमीमध्ये हा किळसवाणा प्रकार घडल्याने ग्रामस्थांसह पालक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार रविवार, दि. 8 डिसेंबरला घडला आहे. मुलाने आठवड्याने वडिलांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्याचा भांडाफोड झाला. करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले की, कसबा बीड फाटा येथील यू. व्ही. अॅकॅडमी आहे. यामध्ये 94 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामधील 23 मुले आणि 6 मुली निवासी आहेत.8 डिसेंबरला रात्री अॅकॅडमीतील मुख्याध्यापक प्रदीप नलवडे हा दुसऱ्या मजल्यावरील अभ्यासिकेत मुलाजवळ झोपला होता. त्याने एका अल्पवयीन मुलाला बोलावून अनैसर्गिक कृत्य केले.
या घटनेमुळे भेदरलेल्या मुलाने हा प्रकार घरातील मंडळींच्या निदर्शनास आणून दिला. संतप्त झालेल्या वडिलांनी करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी पोलिस ठाण्यात मुख्याध्यापक नलवडे याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्यास बुधवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.