Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उपचारासाठी आलेल्या महिलेवर वारंवार बलात्कार; वरवंड येथील डॉक्टरला अटक.

उपचारासाठी आलेल्या महिलेवर वारंवार बलात्कार; वरवंड येथील डॉक्टरला अटक
 

पुणे : डॉक्टर म्हटले की दुसरा देवदूतच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, पण वरवंड येथील एका नराधम डॉक्टरने उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या विवाहित महिलेवर रुग्णालय तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला आहे. याप्रकरणी पाटस पोलीसांनी डॉक्टरला अटक केली आहे. डॉ. सुनिल नामदेव झेंडे (मुळ रा. दिवे ता. पुरंदर जि. पुणे, सध्या रा. वरवंड ता. दौंड जि. पुणे) असे नराधम डॉक्टर आरोपीचे नाव आहे.

 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरवंड येथील धन्वंतरी अँक्युप्रेशर सेंटर आयुर्वेदिक दवाखान्यातील डॉ. सुनील झेंडे यांच्या रुग्णालयामध्ये 21 ऑगस्ट 2024 रोजी पीडित महिला ही पाठीवर गाठ आल्याने उपचारासाठी दवाखान्यात गेली होती. यावेळी आरोपी डॉक्टरने पीडित महिलेला ओढून घेऊन मिठी मारली. त्यावेळी तिने त्यांना डॉक्टर तुम्ही असे काय करता? मी माझ्या घरातील लोकांना सांगेल, असे म्हणाली. त्यावेळी डॉक्टराने त्या महिलेला म्हणाला, 'मला तु मला आवडतेस, आपण दोघे बाहेर फिरायला जावु' असे म्हणाल्याने तिने त्यास नकार दिला. मात्र आरोपीने बळजबरीने धरून दवाखान्याच्या आतील खोलीत घेऊन अत्याचार केले. याबाबत कोणाला सांगु नकोस नाहीतर मी तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली.
त्यानंतर आरोपी डॉक्टरने 21 ऑगस्ट 2024 ते 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. पिडीतेने भितीपोटी अडीच तोळ्याचा सोन्याचा राणीहार घरात कोणास काहीएक न सांगता त्याला दिला. त्यानंतर दहा दिवसानंतर माझा सोन्याचा राणीहार मला परत दया, असे पिडीतेने सांगितले, पण सोन्याचा राणीहार डॉक्टरने दिला नाही. उलट वारंवार तुला तुझा राणीहार पाहीजे असेल, तर तु माझे सोबत शारीरिक संबंध ठेव. नाहीतर मी तुझे घरात सांगेल अशी सारखी धमकी देत पिडीत महिलेचा अडीच तोळ्याचा सोन्याचा राणीहार बळकावला असे फिर्यादीत नमूद केले आहे.
ही फिर्याद पीडित महिलेने पाटस पोलीस चौकीत दिल्याने मंगळवारी (दि. 10) संबंधित डॉक्टरवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित डॉक्टरला पाटस पोलिसांनी अटक केली असून बुधवारी (दि. 11) दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची म्हणजे 16 डिसेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करीत आहेत.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.