Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकदाच गुंतवा 'इतके' पैसे, एलआयसी आयुष्यभर घरबसल्या देईल १२००० रुपये

एकदाच गुंतवा 'इतके' पैसे, एलआयसी आयुष्यभर घरबसल्या देईल १२००० रुपये
 
 
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा त्याचे नियमित उत्पन्नाचे स्त्रोत बंद होतात. या काळाला निवृत्ती म्हणतात. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीनं आपल्या निवृत्तीचं आधीच नियोजन केलं पाहिजे. रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी तुम्ही अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता, जेणेकरून तुम्हाला निवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन मिळेल. या रिटायरमेंट प्लॅन्सपैकीच एक म्हणजे एलआयसी सरल पेन्शन स्कीम. एलआयसी सरल पेन्शन योजना एलआयसीद्वारे चालविली जाते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला १२,००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते..

एलआयसी सरल पेन्शन योजना 

एलआयसी सरल पेन्शन योजना ही एक नॉन-लिंक्ड, सिंगल प्रीमियम, पर्सनल वार्षिक योजना आहे, ज्यामध्ये आपण संपूर्ण आयुष्यासाठी पेन्शन मिळविण्यासाठी एकत्रितपणे गुंतवणूक करू शकता. या योजनेतील गुंतवणूक करण्याचं किमान वय ४० वर्षे आणि कमाल वय ८० वर्षे म्हणजेच ४० ते ८० वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. त्याचबरोबर या योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही..

एलआयसी सरल पेन्शन प्लॅनची पेन्शन तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक घेऊ शकता. मासिक पेन्शन किमान १,००० रुपये, त्रैमासिक पेन्शन किमान ३,००० रुपये, अर्धवार्षिक पेन्शन किमान ६,००० रुपये आणि वार्षिक पेन्शन किमान १२,००० रुपये आहे.

१२ हजारांसाठी किती गुंतवणूक?

निवृत्तीनंतर आयुष्यभर तुम्हाला १२,००० रुपये पेन्शन मिळवायची असेल तर वयाच्या ४२ व्या वर्षी तुम्हाला ३० लाख रुपयांची अॅन्युइटी खरेदी करावी लागेल. यानंतर तुम्हाला महिन्याला १२,३८८ रुपये पेन्शन मिळेल. पेन्शनमध्ये जास्त पैसे मिळवण्यासाठी जास्त गुंतवणूक करावी लागते.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.