Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेरीनाला मलशुद्धीकरण प्रकल्पास तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी:, सुधीरदादा गाडगीळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शेरीनाला मलशुद्धीकरण प्रकल्पास तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी :, सुधीरदादा गाडगीळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
 

सांगली : कृष्णा नदीच्या पात्रात शेरीनाल्याचे पाणी मिसळून प्रदूषण होते ते रोखण्यासाठी नवीन प्रस्तावित मलशुद्धीकरण प्रकल्पास तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली.

नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी  शेरीनाल्यामुळे होणारे कृष्णा नदीचे प्रदूषण या विषयाकडे आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. 
 
शेरीनाल्यामुळे होणारे कृष्णेचे प्रदूषण रोखण्यासाठी नवीन मलशुद्धीकरण प्रस्तावास तातडीने प्रशासकीय मंजुरी द्यावी अशी मागणी केली. या प्रस्तावाबरोबरच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील तसेच सांगली विधानसभा मतदारसंघातील काही प्रलंबित विषय आणि प्रस्तावाबाबत आमदार गाडगीळ यांनी ना. फडणवीस त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व मागण्यांबाबत शासन तातडीने सकारात्मक कार्यवाही करेल असे आश्वासन आमदार  गाडगीळ यांना दिले.
शेरीनाल्यामुळे कृष्णा नदीचे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने त्वरित कार्यवाही करावी. नदी प्रदूषणास जबाबदार असणारे घटक शोधून त्यांच्यावर  कारवाई करावी अशी मागणी आमदार गाडगीळ यांनी केली. आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कृष्णा नदीत शेरीनाल्याचे पाणी मिसळून प्रदूषण होते ते रोखण्यासाठी धुळगाव योजना पूर्वी राबवण्यात आली आहे. या योजनेतून शेरीनाल्यातील दूषित पाणी उचलून ते शुद्ध करून धुळगाव परिसरातील शेतीला दिले जाते. 
 
परंतु पावसाळ्यात किंवा जेव्हा पाण्याची गरज नसते तेव्हा  या पाण्याला फारशी मागणी नसते.त्यावेळी हे अशुद्ध पाणी कृष्णा नदीच्या पात्रात मिसळून नदीचे पाणी प्रदूषित होते. यासाठीच शेरीनाल्यातील अशुद्ध पाणी शुद्ध करण्यासाठी विशेष मलशुद्धीकरण प्रकल्प   राबवण्यात येणार आहे.त्यासाठीचा ९३ कोटी५१ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्यात आला आहे. त्या प्रस्तावास तातडीने प्रशासकीय मंजुरी आवश्यक आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावाच्या मंजुरीबाबत तातडीने कार्यवाही करू असे आमदार गाडगीळ यांना सांगितले.

महापालिकेची अंतिम विकास योजना नकाशा (अधिसूचनेतील निर्णयांचे SM व EP चे दोन्ही नकाशे मंजूर करणे) यासह अन्य महत्त्वाच्या शासन स्तरावरील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना  मंजुरी मिळावी अशीही मागणी आमदार गाडगीळ यांनी केली.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी   हे सर्व विषय तातडीने  मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.