सांगलीच्या मिरजेमध्ये आर्थिक देवाण-घेवाणीतून शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हा युवा समन्वयकावर खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी मतीन काझी याच्यासह हॉटेल मालक आणि त्यांची पत्नी देखील गंभीर जखमी झाली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, मिरजेत रवींद्र येसूमाळी यांचं रस्सा नावाचे हॉटेल आहे. हॉटेल मालक आणि एका कामगाराच आर्थिक देवाण-घेवाणीतून वाद सुरू होता. या वादातून अमन गोदड, सोहेल नदाफ, शंकर रिक्षावाला आणि शिव अथणीकर यांनी हॉटेलवर येत जोरदार राडा घातला. यावेळी हॉटेल मालक रवींद्र येसुमाळी आणि त्यांची पत्नी वैशाली येसूमाळी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी मतीन काझी याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोरानी मतीन काझी याच्यावर देखील कोयत्याने हल्ला केला. यामध्ये मतीन काझीसह तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
या हल्ल्यानंतर मतीन काझी टोळीने संशयीतांच्या घरावर मध्यरात्री हल्ला करून साहित्याची तोडफोड केली आहे. दरम्यान दोन गटात झालेल्या या हल्ल्यामुळे मिरजेत मध्यरात्री मोठ्या प्रमाणात जमाव देखील जमला होता. परंतु पोलिसांनी लाठीमार करून जमावला पांगवले. जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून हल्लेखोर मात्र अद्याप पसार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.