Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'पुष्पा-2'च्या चेंगराचेंगरीत आईच्या मृत्यूनंतर 8 वर्षांचा चिमुकला ब्रेन डेड

'पुष्पा-2'च्या चेंगराचेंगरीत आईच्या मृत्यूनंतर 8 वर्षांचा चिमुकला ब्रेन डेड

हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुन स्टारर  'पुष्प चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी ४ डिसेंबर रोजी चेंगराचेंगरी झाली होती. यात एका ३५ वर्षीय एम रेवती या महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा श्री तेज  नावाचा ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.


या मुलाचा ब्रेन डेड झाला असून सध्या त्याला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलने मंगळवारी जारी केलेल्या हेल्थ अपडेटमध्ये म्हटले आहे की, श्री तेज मुलावर लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्याला ऑक्सिजन सपोर्ट द्यावा लागत आहे.

"त्याचा ताप कमी होत आहे. त्याचे महत्त्वाचे पॅरामीटर्स स्थिर आहेत. तो उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्याची स्थिर न्यूरोलॉजिकल स्थिती लक्षात घेता, व्हेंटिलेटर काढून ट्रेकिओस्टॉमी वैद्यकीय प्रक्रिया केली जाणार आहे," असे सिकंदराबादमधील KIMS कुडल्स हॉस्पिटलने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मुलाच्या मेंदूला गंभीर दुखापत

दरम्यान, संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या नऊ वर्षीय श्री तेजला सरकार आवश्यक ती वैद्यकीय मदत देईल, असे हैदराबादचे पोलिस आयुक्त सीव्ही आनंद यांनी सांगितले. मुलाच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला बरे होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. KIMS हॉस्पिटलमधील डॉक्टरांची टीम मुलाच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे, असे आनंद म्हणाले.

सरकारकडून वैद्यकीय मदत
आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे सचिव ख्रिस्टीना झेड चोंगथू यांनी सांगितले, "आम्ही सदर हॉस्पिटलला मुलाची सर्व आवश्यक ती काळजी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी सरकारदेखील आवश्यक ते सर्व सहकार्य करत आहे." असे त्यांनी पुढे म्हटले. सरकारच्या वतीने आनंद यांनी चोंगथू यांच्यासह हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलाच्या प्रकृतीची विचारपूस केली.

''या दुर्दैवी घटनेनंतर श्री तेजच्या प्रकृतीबद्दल आम्ही चिंतित आहोत. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी माझी प्रार्थना. मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला लवकरात लवकर भेटण्यास उत्सुक आहे.'' अशा भावना अल्लू अर्जुनने X वर पोस्ट करत व्यक्त केल्या होत्या.

अल्लू अर्जुनला अटक आणि सुटका

'पुष्पा २' च्या स्क्रिनिंगवेळी झालेल्या चेंगराचेगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबादमधून अटक करण्यात आली होती. एक रात्र कारागृहात काढल्यानंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.