सांगली येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेश हिंदू न्याय यात्रा
आंदोलन बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ
हिंदू न्याय यात्रा आंदोलन
सांगली दि.10 :- बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांक समाजावर होणार्याा अन्याय, अत्याचार, धार्मिक दडपशाही, आणि त्यांच्या मौलिक हक्कांवरील हल्ल्यांविरोधात मगंळवारी सकल हिंदू समाजाच्यावतीने सांगलीत तहसिलदार कार्यालयावर बांगला देश हिंदु न्याययात्रा काढत निदर्शने केली. यावेळी नायब तहसीलदार मनोहर पाटील यांना आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदु समाजाच्यावतीने निवेदन देण्यात आले.
सकल हिंदु समाजाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रातील तहसिलदार कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. सांगलीतील तहसिलदार कार्यालयासमोर होणार्याा आंदोलनात आमदार सुधीर गाडगीळ सहभागी झाले होते. यावेळी गणेश गाडगीळ, सांगली इस्कॉनचे अध्यक्ष श्रीमान मत्स्य अवतार दास, इस्कॉन उपाध्यक्ष, शुभानंद दास, राधा निल माधव दास, किरण कुलकर्णी, भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी प्रकाश तात्या बिर्जे, अविनाश मोहिते, श्रीकांत शिंदे, जयवंत पाटील, विनायक शिंदे, गणपती साळुंखे, हिंदू एकता आंदोलनाचे सांगली जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील, उपाध्यक्ष विजय टोने, विनायक एडके, शिवसेना शिंदे गटाचे उमाकांत कार्वेकर, जगदीश हेरवाडे, राणीताई कमलाकर, उर्मिला बेलवलकर, हेमलता मोरे, स्मिता भाटकर, निशा गाडगीळ, व्यंकटेश काबरा, संदीप सरनोबत, राजू आवटी, रणजित सावंत, भाजपा शिवसेना व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. बांगलादेशातील हिंदू समाज गेल्या काही दशकांपासून धार्मिक हिंसा, मालमत्तेच्या जबरदस्तीने बळकावणी, मंदिरांच्या तोडफोडी, तसेच जबरदस्ती धर्मांतरासारख्या घटना सहन करत आहे. या समुदायाच्या मानवाधिकारांचे उल्लंघन करून त्यांना त्यांच्या देशात असुरक्षिततेच्या गर्तेत ढकलले जात आहे.
अल्पसंख्यांक समुदायावर होत असलेल्या या अत्याचारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचा फोडणे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणे ही काळाची गरज आहे. या आंदोलनाव्दारे बांगलादेशातील हिंदूच्या जीवित, संपत्ती, आणि धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस पावले उचला, बांगलादेश सरकारला अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे रक्षण करण्यास भाग पाडण्यासाठी जागतिक दबाव निर्माण करा, भारत सरकारने या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय पटलावर नेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना सुरू करा, अत्याचारग्रस्त हिंदूंना संरक्षण व समर्थन देण्यासाठी विशेष धोरण आखा आदी मागण्या करण्यात आल्या. तासगांव, इस्लांमपुर, विटा, सांगली शहर, जत, कवठेमहकांळ या ठिकाणीच्या तहसिलदार कार्यालयात निवेदन देण्यात येणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.