सूरत : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातच्या सूरत जिल्ह्यातून खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली आहे. सूरतमध्ये भाजपच्या महिला नेत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
भाजपच्या महिला नेत्याने आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गुजरातच्या सूरत शहरातील अलथाना वार्ड क्रमांक ३० मधील भाजपच महिला मोर्चाच्या अध्यक्षा दीपिका पटेल यांनी आत्महत्या केली आहे. ३४ वर्षीय भाजप महिला नेत्या दीपिका पटेल यांनी राहत्या घरी जीवन संपवलं. दीपिका यांच्या नातेवाईकांनी तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. दीपिका यांच्या नातेवाईकांनी फॉरेन्सिक पोस्टमार्टमची मागणी केली आहे.दीपिका पटेल यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केल्याची माहिती मिळाली आहे. दीपिकाच्या आत्महत्या प्रकरणावर त्यांच्या नातेवाईकाने म्हटलं की, 'दीपिका गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची कार्यकर्ता होती. ती समाजसेवा करायची. यादरम्यान, तिच्या कुटुंबाला तिची हत्या होण्याची भीती होती. आत्महता करताना त्यांचे कुटुंबीय आणि मुले घरात होते. तर त्यांचे पती शेतात होते.दीपिका पटेल आत्महत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. दीपिका पटेल यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याबाबतची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टनंतर समोर येण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.