राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीने 230 हून अधिक जागा जिंकल्याने राज्यात महायुतीचीच सत्ता स्थापन होणार आहे, हे स्पष्ट झालं.
मात्र, मुख्यमंत्रिपदी कोण बसणार याबाबतचा ठोस निर्णय झाला नसल्याने सत्ता स्थापनेला उशीर होत आहे. अशातच एकनाथ शिंदेंबाबत एक मोठी बातमी समोर आली. एका वर्षभरासाठी शिंदेंच मुख्यमंत्री राहू शकतात, अशी सुत्रांची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम आहे. एकीकडे मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होत असताना आता नवा फॉर्म्युला समोर आला. सुरूवातीचं एक वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली. या माहितीला भाजपने दुजोरा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्यात नेतृत्वात निवडणूक लढवली गेली. मतदारांनी त्यांना कौल दिल्याने एकनाथ शिंदे हे एक वर्ष मुख्यमंत्री राहतील, अशी भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. जनमताचा अनादर होऊ नये, यासाठी भाजपचे काही ज्येष्ठ नेते ही भूमिका घेत असल्याचे समोर आले आहे.
आगामी काळात राज्यात महापालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणूक आहेत. शिंदेंचा ग्रामीण भागात वरचष्मा आहे. त्यांनी सर्वच समाज घटक मानतात, ते सर्वांना सोबत घेऊण चालणारे नेतृत्व आहे. त्यामुळं एकावर्षासाठी शिंदेच मुख्यमंत्री असावेत, अशी भूमिका भाजपची काही नेतेमंडळी घेत आहे.
एकनाथ शिंदे नाराज…
महायुतीने महाराष्ट्रातील 288 पैकी 230 विधानसभेच्या जागा जिंकल्या आहेत. भाजप 132 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने 57 तर अजित पवार यांच्या पक्षाने 41 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झालं. मात्र, महायुतीची गाडी सत्तावाटपावर अडली आहे. अशातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या मूळ गावी साताऱ्याला गेलेत. सत्ता स्थापनेच्या गडबडीतच ते गावी गेल्यानं चर्चांना उधाण आलं. ते नाराज असल्याची चर्चा आहे.मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर झाल्याशिवाय, पुढची चर्चा होणार नाही, असा पवित्रा शिंदे आणि अजित पवारांनी घेतल्याची माहिती आहे. अशाचत शिंदे एका वर्षभरासाठी मुख्यमंत्री होणार असं बोलल्या जातं. त्यामुळं आगामी काळात राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.