Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लाखो रुपयांची लाचेची मागणी भोवली; सोलापुरातील डॉक्टरला रंगेहात पकडले

लाखो रुपयांची लाचेची मागणी भोवली; सोलापुरातील डॉक्टरला रंगेहात पकडले
 

सोलापूर : लॅबच्या तक्रारीचा अहवाल सकारात्मक पाठण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव विष्णूपंत जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. बुधवारी ही कारवाई करण्यात आली. सदर बझार पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती.

तक्रारदाराची लॅब आहे. त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात कार्यान्वित असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत दाखल होणाऱ्या रुग्णांचे रक्त व लघवीचे नमुने तपासून रिपोर्ट सादर करण्याचे काम निविदेद्वारे मिळालेले होते. तक्रारदाराच्या लॅबच्या विरोधात आलेला तक्रारी अर्ज पुढील चौकशीसाठी डॉ. माधव जोशी यांच्याकडे होता. 
 
या अनुषंगाने डॉ. जोशी यांनी तक्रारदारांना संपर्क साधून त्यांच्या लॅबच्या कामाबद्दल तक्रार प्राप्त झाल्याचे सांगून तुमच्या बाजूने अहवाल वरिष्ठाकडे पाठवतो, असे सांगून लॅबविरोधात अहवाल पाठवल्यास महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे उर्वरित बील निघणार नाही, अशी भीती दाखवून २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत डॉ. जोशी यांचा सहभाग आढळून आला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे-खराडे, उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्रीराम घुगे, राजू पवार, सचिन राठोड, शाम सुरवसे यांनी ही कारवाई केली.

आधी पडताळणी मग कारवाई

डॉ. जोशी यांनी तडजोडीअंती १ लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे लाच लुचपतच्या पथकाने मंगळवारी केलेल्या पडताळणी कारवाईत निष्पन्न झाले. त्यानुसार बुधवारी सापळा लावण्यात आला. यात पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये लाच स्वीकारल्याचे लाचलुचपत पथकाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली लोकशाहीत महत्वाचा आणि न्यायदानाचे काम करणाऱ्या स्तंभातील न्याय देणाऱ्या न्यायाधीशानेच जामीन देण्यासाठी पाच लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा येथे कारवाई करून जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय लक्ष्मणराव निकम, आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी मुंबई) आणि अन्य एक असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका २४ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.