Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शाहांच्या वादग्रस्त विधानानंतर अभिनेत्याची संघावर खळबळजनक टीका; "गोळवलकरांनी बाबासाहेबांची जात काढली"

शाहांच्या वादग्रस्त विधानानंतर अभिनेत्याची संघावर खळबळजनक टीका; "गोळवलकरांनी बाबासाहेबांची जात काढली"
 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात वातावरण तापलं आहे. संसदेत आणि विधानभवनात याचे तीव्र पडसाद उमटलेले आज पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विधानसभेत आदित्य ठाकरे, इतर प्रतिनिधींनी आंदोलन केलं. त्यातच मराठी अभिनेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे समर्थक किरण माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अमित शाह आणि मनुवाद्यांवर टीका केली. संघाने कधी आंबेडकरांना स्वीकारलंच नाही असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.

किरण त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं कि,"…अहो, या मनुवाद्यांना खरंतर आपल्या शिवरायांपासून भीमरायांपर्यन्त सगळे महामानव आतनं लै खुपतात… वरवर तोंडदेखला जयजयकार करतात हे....खोटं वाटतंय? मग छत्रपतींचा पुतळा कोसळला, तेव्हा त्या पुतळ्याचं वाजतगाजत उद्घाटन करणार्‍या सत्ताधार्‍यांवर टीकेचा भडीमार करणारा एक मनुवादी संघोटा दाखवा ! पैजेवर सांगतो. अहो औषधालाही सापडणार नाही. छ. शिवरायांच्या नावानं धर्मद्वेषाचं दुकान उघडून, बहुजन पोरांना भरकटवणारे भलेभले बहाद्दर, पुतळा पडल्यावर मात्र शेपुट घालून गपगार बसले होते. तसंच, कालच्या डॉ. आंबेडकरांबद्दलच्या त्या निंदनीय वक्तव्याचा निषेध करणारं त्यांच्यातलं एकबी बांडगुळ सापडणार नाही…"

"डॉ. आंबेडकरांविषयी यांचा राग लै जुना आहे. एक म्हणजे, आंबेडकरांनी यांचं वर्चस्व झुगारून या मातीत पुन्हा रूजवलेला धम्म... आणि दुसरा सगळ्यात मोठा घाव म्हणजे 'संविधान' ! संविधानानं सगळी माणसं समान केली. पेशवाईत शुद्र मानून ज्यांना पाठीला खराटा आणि गळ्यात मडकं बांधावं लागलं होतं, त्यांच्या पुढच्या पिढ्या संविधानामुळं डॉक्टर, इंजिनीयर, वकील, शास्त्रज्ञ झाल्या. तथाकथित उच्चवर्णीयांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या.

त्यांचं मुळ दुखणं हे आहे."
"…जेव्हा संविधान तयार होत होतं, तेव्हा संघोट्यांची भुमिका काय होती??? त्या काळात त्यांचं 'ऑर्गनायजर' नांवाचं मुखपत्र होतं. त्यात त्यांनी लिहीलंय, "या देशाचं संविधान एकच आहे, मनुस्मृती... आणि या संविधानाचे शिल्पकार आहेत महर्षी मनू." पुढं कुत्सितपणे असं लिहीलंय की, "आज आंबेडकर आणि नेहरू हे स्वयंघोषित 'महर्षी' होऊन मनुस्मृतीचे कायदे बदलताहेत."
हा लेख 'ऑर्गनायजर'च्या ३० नोव्हेंबर १९४९ च्या अंकात आहे.

ऑर्गनायजरच्या ६ सप्टेंबर १९४९ च्या अंकात गोळवलकरांनी बाबासाहेबांची जात काढली होती. या जातीच्या माणसाने राज्यघटना लिहू नये, यासाठी संघाने देशभर आंदोलनं केली होती. हे सगळं मात्र ही पिलावळ लपवून ठेवते. हल्ली त्याच ऑर्गनायजरमध्ये बहुजनांना भरकटवण्यासाठी बाबासाहेबांची खोटी स्तुतीही केली जाते. दुटप्पी आणि कपटी वृत्ती. असो. माझ्या भावाबहिणींनो, आता परवाच्या त्या वक्तव्यामागच्या तडफडीचं कारण अजून इस्कटून सांगायची गरज हाय का?

जय शिवराय... जय भीम."
किरण यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत याबद्दल सहमती दर्शवली आहे. "तुम्ही योग्य बोलत आहात." अशी कमेंट एकाने या पोस्टवर केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.