Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद पवार गटाला मोठा धक्का, विश्वास दाखवून उमेदवारी दिली तो साथ सोडणार?

शरद पवार गटाला मोठा धक्का, विश्वास दाखवून उमेदवारी दिली तो साथ सोडणार?

जळगाव, प्रतिनिधी विजय वाघमारे महायुतीला राज्यात भरभरुन मतं मिळाली. महायुतीत 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्र म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. आता राज्यात तीन दिवसाचं अधिवेशन असणार आहे. या विधानसभा निवडणुकीनंतर निवडून आलेल्या 288 उमेदवारांना अस्थायी अध्यक्ष कालीदास कोळमकर शपथ देणार आहेत.

 

महायुतीला मिळालेल्या महाविजयामुळे विधानसभेत विरोधी पक्षांच्या आमदारांची संघ्या अर्ध शतकापर्यंतच सीमित राहिली आहे. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण होणार याचही उत्सुक्ता सर्वांना आहे. तीन दिवस चालणाऱ्या या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित उमेदवारांचा शपथविधी आणि शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवड हेच या अधिवेशनातील प्रमुख कामकाज असणार आहे. विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण ही होणार आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींदरम्यान एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जळगावचे माजी पालकमंत्री आणि शरद पवार यांच्या जवळचे नेते गुलाबराव देवकर हे शरद पवार गटाची साथ सोडण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गुलाबराव देवकर अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शरद पवार गटाचे नेते माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सूत्रांनी दिली आहे. गुलाबराव देवकर यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली याची अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र या भेटीनंतर ते शरद पवार गटाची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाची ताकद उत्तर महाराष्ट्रात वाढणार असल्याची चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघातून गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्यात काँटे की टक्कर होती.
गुलबाराव पाटील सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्क्याने जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही गुलाबराव रघुनाथ पाटील यांनी विजय मिळवला होता. 2024 च्या निवडणुकीत दोन्ही गुलाबराव यांच्यात अटीतटीची लढत होती. मात्र गुलाबराव पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.