Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! मेहुणीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने जावयाने थेट गळाच कापला; कचराकुंडीत मिळालं शिर...

धक्कादायक! मेहुणीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने जावयाने थेट गळाच कापला; कचराकुंडीत मिळालं शिर...
 

शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने जावायाने मेहूणीने शिर धडावेगळं करत तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांना तिचं शिर कचराकुंडीत आढळून आलं आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गुरुवारी पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात ही घटना घडली आहे, अतीउर रहमान लस्कर असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याला बसुलडांगा या गावातून ताब्यात घेतलं आहे. तसेच चौकशीदरम्यान, त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला गेल्या दोन वर्षांपूर्वी तिच्या पतीपासून विभक्त झाली होती. ती रिजेंट पार्क भागातील एका घरी काम करत होती. आरोपी जावाई तिला रोज याठिकाणी गाडीने सोडून देत होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्याने तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र, महिलेने नकार दिला. तेव्हापासून ती आरोपीपासून दूर राहू लागली. तसेच तिने त्याचा नंबरही ब्लॉक केला. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने गुरुवारी तिला दुसऱ्या नंबरवरून फोन करत, एका निर्माणाधिन इमारती जवळ बोलवले.

या ठिकाणी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की आरोपीने महिलेचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर बरोबर आणलेल्या धारधार वस्तूने महिलेचा गळा कापत शिर धडापासून वेगळं केलं. त्याने तिच्या शरीराचे तीन तुकडे केले. हे तुकडे त्याने वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.

अशातच शुक्रवारी सकाळी ग्रहम रोडवरील एका कचराकुंडीत महिलेचं शिर असल्याची माहिती कोलकाता पोलिसांना मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत शिर ताब्यात घेतलं आणि तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. तसेच याठिकाणचे सीसीटीव्हीही तपासण्यात आले. यावेळी आरोपीने पॅस्टीक बॅगमध्ये शिर आणून टाकल्याचं पोलिसांच्या निर्देशनास आलं. पोलिसांनी १२ तासांत आरोपीची ओळख पटवत त्याला अटक केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.